प्रहार    

विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मोफत वसतिगृह, समाजकल्याण विभागाची नवीन योजना...

  105

विद्यार्थ्यांना राहण्यासाठी मोफत वसतिगृह, समाजकल्याण विभागाची नवीन योजना...  

मुंबई :  राज्य सरकारच्या  समाजकल्याण विभागाने (social welfare) मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हिताचा निर्णय घेतलेला आहे, इयत्ता आठवीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे, अशी विद्यार्थ्यांच्या पालकांनी भावना व्यक्त केली. इयत्ता आठवी पासून ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घेयाचा आहे. त्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन भरावेत, अशी माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे.

तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात (student hostel) नव्याने बदल देखील करण्यात आलेत.  विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक इयत्तेनुसार पाठ्यपुस्तके, स्टेशनरी, स्पर्धा परीक्षेच्या (सीईटी, नीट, एमपीएससी, युपीएसससी) तयारीसाठी पुस्तके, संगणक कक्ष, लायब्ररी, अभ्यासिका, अंतर्गत जीम, भोजन व शुद्ध पिण्याचे पाणी, प्रशस्त स्वच्छ निवासगृहे, क्रीडा साहित्यदेखील त्या वसतिगृहांमध्ये उपलब्ध असणार आहेत. तसेच  विद्यार्थ्यांसाठी २४ तास सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही कॅमेरदेखील उपलब्ध असणार आहेत.

तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना दरमहा ५०० निर्वाह भत्ता दिला जातो. तर जिल्हास्तरावरील वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या मुलींना ६०० रुपये भत्ता दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्व अर्ज भरावेत असे समाज कल्याण विभागातील आयुक्तांनी आवाहन केले आहे. तसेच वसतिगृहात मागसवर्गीय मुलांना आणि मुंलीना प्रवेश घेता येणार आहे. तसेच मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना शहरात आणि ग्रामीण भागात राहण्यासाठी राज्य सरकारची भन्नाट योजना असल्याचे देखील बोललं जातं आहे.

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अमेरिकन कंपन्यांवर बहिष्कार?

प्रतिनिधी:अमेरिकेन भारतावर अतिरिक्त टेरिफ कर लावल्यानंतर आता त्याचे पडसाद भारतातील जनसामान्य व विविध

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतील २६.३४ लाख महिला झाल्या नावडत्या, योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई होणार?

मुंबई: राज्यात सर्वात प्रभावी ठरत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत १२ हप्ते जारी करण्यात आले

गजवा-ए-हिंद करू इच्छिणाऱ्यांना नितेश राणेंचा इशारा! मराठीच्या मुद्द्यावर म्हणाले, 'आम्ही विटेचे उत्तर दगडाने देऊ'

ओडिशा: भुवनेश्वरमधील 'सुशासन संवाद'मध्ये मंत्री नितेश राणे यांनी हिंदुत्व, मराठी अस्मिता, लव्ह जिहाद आणि

Pune Rave Party: पोलिसांनीच अमली पदार्थ प्लांट केले! पुणे रेव्ह पार्टी प्रकरणाच्या सुनावणीत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी

खेवलकर यांनी अंमली पदार्थांचे सेवन केलेले नाही किंवा ते जवळही बाळगले नसल्याचा युक्तीवाद  पुणे: पुण्यातील रेव्ह

भाजपच्या पहिल्या महापौरासाठी ‘देवाभाऊ’ करताहेत पेरणी!

विरार (गणेश पाटील) : वसई आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने अनपेक्षित यश मिळवले. तसेच आता

राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

मुरबाड : मुरबाड येथील माळशेज-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर नढई मंदिराच्या मागे व नढई-नारीवलीकडे वळण घेऊन