निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

  64

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अनेक पोषक तत्वे असतात. रोजच्या आहारात एक छोटा चमचा मोरिंगा पावडर अर्थात शेवग्याच्या शेंगांची पावडर मिसळली आणि ते अन्न खाल्ले तर शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळू शकतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. वजन नियंत्रणात राहण्यास तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.



मोरिंगा पावडर अर्थात शेवग्याच्या शेंगांची पावडर खाण्याचे फायदे


रोजच्या आहारात एक छोटा चमचा मोरिंगा पावडर अर्थात शेवग्याच्या शेंगांची पावडर मिसळली आणि ते अन्न खाल्ले तर शरीराला होणारे फायदे थोडक्यात समजून घेऊ.




  1. पोषक तत्वांनी परिपूर्ण : शेवग्याच्या शेंगांच्या पावडरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त भरपूर प्रमाणात असतात, तसेच जीवनसत्त्वे अ, क आणि ई देखील असते.

  2. रोगप्रतिकारशक्ती वाढवते : मोरिंगात अँटीऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.

  3. वजन कमी करण्यास मदत करते : शेवग्याच्या शेंगांच्या पावडरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, ते खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

  4. रक्तातील साखर नियंत्रित करते : रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर उपयुक्त आहे.

  5. पचनक्रिया सुधारते : शेवग्याच्या शेंगांच्या पावडरमध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते.

  6. हाडे मजबूत करते : मोरिंगात कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने हाडे मजबूत होतात, तसेच दातांसाठी देखील ते फायदेशीर आहे.

  7. शरीरातील विषारी घटक बाहेर काढते : शेवग्याच्या शेंगांत अँटीऑक्सिडंट्स असल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत होते.

    शेवग्याच्या शेंगांची पावडर कशी वापरावी ?


    मोरिंगा पावडर अर्थात शेवग्याच्या शेंगांची पावडर पाण्यासोबत, दुधासोबत किंवा इतर कोणत्याही पेयासोबत घेऊ शकता. सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणातही तुम्ही ही पावडर वापरू शकता. तुम्ही ही पावडर भाज्यांमध्ये किंवा सूपमध्ये देखील वापरू शकता. डॉक्टरांच्या सल्ल्याने मोरिंगा पावडर अर्थात शेवग्याच्या शेंगांची पावडर खाणे हिताचे.

Comments
Add Comment

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी

Health: रात्री झोपण्याआधी खाऊ नका या गोष्टी...नाहीतर येणार नाही झोप

मुंबई: प्रत्येकाला वाटते की रात्रीची झोप ही शांत आणि गाढ असावी. मात्र अनेकदा आपण झोपेच्या आधी अशा गोष्टींचे सेवन

Health: दह्यात मीठ टाकून खावे की साखर? जाणून घ्या काय योग्य ते

मुंबई: दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. दिवसा दही खाणे शरीरास आरोग्यदायी मानले जाते. अनेक पदार्थ

दररोज करा दालचिनीचे सेवन, हे आजार राहतील दूर

मुंबई: दालचिनीला इंग्रजीत सिनॅमन असे म्हणतात. अनेक लोक दालचिनीचा वापर मसाल्यांमध्ये करतात. मात्र तुम्हाला माहीत