WEF News: World Economic Forum कडून भारताचे कौतुक भारताने उर्जेच्या क्षेत्रात केली उल्लेखनीय प्रगती - रिपोर्ट

प्रतिनिधी: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) कडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे. त्यासंबंधात त्यांनी एक नवा अहवाल प्रसिद्ध करून त्यात ' जागतिक अर्थव्यवस्थेत भारताने चौथ्या क्रमांकावर झेप घेताना जागतिक उर्जेच्या परिवर्तनात भारत महत्वाची भूमिका बजावत आहे. केवळ झपाट्याने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेमुळे नाही तर जगभरात भरमसाठ वाढत असलेल्या उर्जेच्या उत्सर्जनामुळे, तसेच जागतिक उर्जा धोरणात होत असलेल्या बदलात भारत मोठी भूमिका बजावत आहे ' असे जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संस्था वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आपल्या अहवालात म्हटले आहे.


जगातील महत्वाचे उर्जा हे संसाधन वाचवणे हे भल्या अर्थव्यवस्थेसह शक्य असते. अशा वेळेत भारताने गगनभरारी घेत आपली नवी नेतृत्वशैली जगासमोर आणली आहे. यानुसार युनायटेड स्टेट्स,चीन,युरोपियन युनियन,जपान,भारत या अर्थ व्यवस्थेच्या प्रयत्नासह टिकाऊ उर्जा (Sustainable Energy) क्षेत्रात मोठे कार्य होऊ शकते. अशातच भारत या पारंपरिक ऊर्जा व नवउर्जा संसाधनांसाठी पुढाकार घेत आहे.


या ५ अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास जगातील अर्धी लोकसंख्या या देशांमध्ये राहते. म्हणूनच या देशातून पर्यावरणाला हानिकारक असणारे उर्जेचे किंवा कार्बन उत्सर्जन (Carbon Emission) होत असते. यासंदर्भात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ने म्हटल्याप्रमाणे, चीन व भारताने उत्सर्जन मर्यादित केल्याचे म्हटले आहे. भविष्याचा विचार करतानाच तंत्रज्ञानासह शाश्वत विकासाकरता भारत अग्रेसर असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनर्जी, विशेषतः स्वच्छ इंधनसह भारताने इक्विटीत आघाडी जगभरात आघाडी राखली आहे. भारताने यासाठी व तंत्रज्ञानासह उत्सर्जन नियंत्रणासाठी मोठी गुंतवणूक व मेहनत केल्याचा दावा या अहवालात केला गेला आहे. तथापि भारताने ग्रामीण भागात इलेक्ट्रिसिटीचा मुबलक पुरवठा, उर्जेच्या आयातीवरील अवलंबन, ग्रामीण भागातील शाश्वत विकासात आणखी प्रगती करण्याची आवश्यकता असल्याचेही या अहवालात नमूद केले गेले आहे.


वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने भारताच्या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनचेही कौतुक करत भारताच्या स्वच्छ उर्जेच्या विविध स्तरांवर व विविध राज्यांतील प्रयत्नांना दुजोरा दिला आहे. नुकताच भारताने गुजरातमध्ये केमिकल इंडस्ट्री, तमिळनाडूत नव्या अक्षय उर्जेचा (Renewable Energy) प्रकल्प उभारले होते. त्यावर कौतुकाची थाप जागतिक स्तरावर भारताला मिळाली. नॅशनल इनव्हेसमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (National Investment and Infrastructure Fund NIIF) यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे. स्वच्छ उर्जेच्या व स्वच्छ इंधनांच्या वाढीसाठी भारत खाजगी गुंतवणूकीला व परदेशी गुंतवणूकीला देखील चालना देत आहे. याचाच एकत्रित परिणाम म्हणून भारतात नव्या शाश्वत विकासाकडे मार्गक्रमण करत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारतासह ७६ देशांनी आपल्या उर्जा परिवर्तनात चांगली कामगिरी केली आहे. त्यातील अहवालानुसार, केवळ २८ टक्के देशांनी सर्वांगिण विकासाची नोंद केली आहे.भारत यामध्ये मोठ्या प्रमाणात शाश्वत विकासाकडे तेजीने मार्गक्रमण घेत असल्याने जागतिक स्तरावर याची दखल घेतली जात आहे.

Comments
Add Comment

Delhi bomb blast case: दहशतवादी डॉक्टरांच्या नेटवर्कचा पर्दाफाश, २० हून अधिक अटक

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबरला झालेल्या भयंकर बॉम्बस्फोटानंतर दिल्लीमध्ये

अमित शाहांशी बोलले एकनाथ शिंदे, महायुतीतला संघर्ष टाळण्यासाठी केली चर्चा

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

इंदुरीकर महाराज झाले नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी

मुंबई : आपल्या खास शैलीत कीर्तन आणि समाजप्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यात केलेल्या

भाजपमधील वाढत्या इनकमिंगमुळे शिवसेनेत अस्वस्थता, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. या

मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवर जन्मलेले बाळ झाले 'नैसर्गिकरित्या बरे'.

मुंबई : राम मंदिर स्टेशनवर जन्मलेल्या बाळाची तब्येत जन्मानंतर काही तासांत खालावली होती. पण वेळेत उपचार

मुंबईतील कुर्ला परिसरात गॅस पाइपलाइन गळतीमुळे लागली आग

मुंबई : कुर्ला पश्चिमे येथील विनोबा भावे नगरमधील एलआयजी कॉलनीच्या मागे असलेल्या मुबारक इमारतीत दुपारी गॅस