मेट्रो-३ मार्गिकेच्या बीकेसी, वरळी स्थानकांत छतातून पाणी गळती

मुंबई : मुंबई मेट्रो-३ प्रकल्पातील बीकेसी आणि वरळी स्थानकांमध्ये गळतीचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाणी साचल्याच्या घटनेनंतर आता वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) मेट्रो स्थानकात भिंतींना ओलावा, छतातून पाणी गळती असे दृश्य दिसून येत आहेत. याआधी गळती रोखण्यासाठी एमएमआरसीने पाण्याच्या बादल्या ठेवल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.


आता गळतीच्या ठिकाणी कर्मचारी सातत्याने पाणी पुसताना दिसत आहेत. प्रवाशांनीही यासंदर्भात सोशल मीडियावर फोटो शेअर करत टीका केली आहे.


सर्वसामान्य नागरिक, प्रवाशांनी समाजमाध्यमांवर मेट्रो स्थानकातील गळतीची छायाचित्रे, चित्रफिती पोस्ट करून 'मेट्रो-३'च्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे. वरळी आणि बीकेसी मेट्रो स्थानकांत होत असलेल्या गळतीविषयी विचारणा केली असता एमएमआरसीने बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप फेटाळून लावला. काही ठिकाणी गळतीच्या किरकोळ समस्या उद्भवत असून त्याची कंत्राटदारांकडून तातडीने दुरुस्ती करुन घेण्यात येत आहेत.


मेट्रो ३ वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासूनचा हा पहिलाच पावसाळा आहे. त्यामुळे आवश्यक ती दुरुस्ती करून घेतली जात आहे.

Comments
Add Comment

वर्षाच्या पहिल्याच दिवशीच मुंबईत पाऊसच आगमन

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने मुंबईकरांना आनंदाचा सुखत धक्का बसला आहे. वाढत्या

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी इक्बाल सिंग चहल मुख्य निरीक्षक

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला

नव्या विमानतळाच्या धावपटटीच्या कार्यक्ष्मतेसाठी ‘टॅक्सीवे एम’ कार्यान्वित

गर्दीच्या वेळी आगमन आणि प्रस्थानाचा गोंधळ टळणार मुंबई : जगातील सर्वात जास्त व्यस्त सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक

मध्य रेल्वेला पार्सल वाहतुकीतून १८३ कोटी रुपयांची कमाई

मुंबई : चालू आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने नियोजित पार्सल गाड्या, भाडेतत्त्वावरील पार्सल गाड्या आणि मागणीनुसार

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती मुंबई : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण

समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

भिवंडी बायपास रस्त्याचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार मुंबई : भिवंडी बायपास रस्त्याचे काम आता अंतिम