सलमान खानच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’ च्या टायटल साँगचा धमाकेदार लाँच!

मुंबई: ‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ च्या प्रचंड यशानंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा तिहेरी डोस घेऊन ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एका भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आले. या सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची विशेष उपस्थिती होती, ज्यामुळे कार्यक्रमाचे आकर्षण खूपच वाढले होते. यावेळी सलमान खानने गाण्याचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आणि विशेष म्हणजे, ‘येरे येरे पैसा ४’ मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली.


या जबरदस्त गाण्याला वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजाने अधिकच रंगत आणली असून, अमितराज यांनी याला ऊर्जा आणि एक वेगळीच धुंद दिली आहे. चित्रपटातील इतर गाण्यांना पंकज पडघन यांचे संगीत लाभले आहे, तर हे टायटल गाणे सचिन पाठक (यो) यांनी लिहिले आहे. 'येरे येरे पैसा ३' च्या गाण्यातील सर्व कलाकारांची ऊर्जा पाहून यंदाचा भाग आणखीन धमाल आणि मनोरंजनाने भरलेला असणार, यात शंका नाही.


या गाण्याबद्दल आणि चित्रपटाबद्दल बोलताना सलमान खान म्हणाला, “हे गाणे अप्रतिम झाले आहे. गाण्यावरूनच चित्रपट किती जबरदस्त असेल याचा अंदाज येतोय. चित्रपटाची संपूर्ण टीम जबरदस्त आहे. या सगळ्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि या चित्रपटाच्या चौथ्या भागात मला सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.”


या म्युझिक लाँच कार्यक्रमाबद्दल बोलताना दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “येरे येरे पैसा ३' ही केवळ एक फ्रँचाईजी नाही, तर प्रेक्षकांशी आमचा भावनिक संबंध आहे. या भागात अधिक मोठं, धडाकेबाज आणि थरारक काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे.”


निर्माते अमेय विनोद खोपकर आणि निनाद बत्तीन यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हटले, “सलमान खानने वेळात वेळ काढून आमच्यासाठी या सोहळ्याला उपस्थित राहणे, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या टायटल साँगच्या माध्यमातून चित्रपटाची धमाकेदार झलक प्रेक्षकांसमोर आली आहे, आता चित्रपटगृहात पूर्ण धमाका अनुभवायला मिळेल.”


धर्मा प्रॉडक्शन्सचे अपूर्व मेहता म्हणाले, “मराठी सिनेमाची गुणवत्ता आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. ‘येरे येरे पैसा ३’ हा एक परिपूर्ण मनोरंजनपट असून आम्ही याचा भाग झाल्याचा आनंद आहे.”


धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे चित्रपटाचे निर्माते असून सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत.


चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. कलाकारांच्या चमकदार यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. ‘येरे येरे पैसा ३’ चे एनर्जेटिक टायटल साँग पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

Comments
Add Comment

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी

ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक पिढ्यांना भुरळ घालणाऱ्या सुवर्णकाळातील दिग्गज

‘ताठ कणा’ मध्ये दिसणार उमेश आणि दिप्तीची जोडी

मुंबई : सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी इमेज आहे. प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी

श्रेया घोषालच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी! ओडिसाच्या बाली यात्रेला गालबोट

ओडिसा: सुप्रसिद्ध भारतीय गायिका श्रेया घोषालचा ओडिसा कटक येथे १३ नोव्हेंबरला लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित केला होता.