'गाडी नंबर १७६०'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर, रहस्य आणि विनोदी यांचा मिलाफ असणाऱ्या काही निवडक चित्रपटांमध्ये लवकरच आणखी एका दमदार चित्रपटाची भर पडणार आहे, ती म्हणजे ‘गाडी नंबर १७६०’ची. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, रहस्य आणि विनोदाने भरलेला हा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ट्रेलरमध्ये दिसतेय, की प्रत्येकजण पैशांनी भरलेल्या एका काळ्या बॅगेच्या मागे लागलेला आहे. ही बॅग कुणाची आहे? तिच्यामध्ये काय दडलं आहे? आणि ‘गाडी नंबर १७६०’ चं या सगळ्याशी काय संबंध आहे? हे सगळं एक अनोखं रहस्य आहे, जे ४ जुलैला चित्रपटगृहात उलगडणार आहे. दरम्यान चित्रपटातील वातावरण हलकं-फुलकं असलं तरी, त्यामागे एक खोल आणि विचार करायला लावणारं कथानक आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच, एक मोठं रहस्य शेवटपर्यंत उलगडत जाणार आहे आणि ही या चित्रपटाची खासियत ठरणार आहे.

 



चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड म्हणतात, “हा चित्रपट म्हणजे केवळ एक रहस्यमयी कथा नाही, तर मानवी लालसेचा आणि गोंधळलेल्या नैतिकतेचा एक आरसा आहे. प्रत्येक पात्र बॅगेच्या मागे का लागले आहे, यामागील कारणे वेगवेगळी असली तरी त्यांची उद्दिष्टं एकसारखीच आहेत ती म्हणजे पैसा. प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्यासाठी आम्ही कथानकाला थोडे हटके वळण दिले आहे. या प्रत्येक वळणावर प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार आहे.''

निर्माते कैलाश सोराडी म्हणतात, '' तन्वी फिल्म्सच्या वतीने आम्ही प्रेक्षकांसमोर नेहमीच दर्जेदार आणि हटके कथा घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ‘गाडी नंबर १७६०’ हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच एक सशक्त कथा घेऊन आला आहे. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करून त्यांना शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवण्याची ताकद या चित्रपटात आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे.''

तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी आहेत, तर लेखन योगीराज संजय गायकवाड यांनी केले आहे. चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांसारख्या दमदार कलाकारांचा सहभाग आहे.

 

 
Comments
Add Comment

Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित

Kareena Kapoor Pregnancy : करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? नणंद सबा पटौदीने अखेर मौन सोडलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार