Swiss Bank Breaking : मोठी बातमी: स्विस बँकेने जाहीर केली आकडेवारी समोर १० वर्षात भारतीयांच्या ठेवीत 'इतक्या' टक्क्याने घसरण!

  103

प्रतिनिधी: भारत विकसनशील असला तरी भारत श्रीमंत आहे अशी प्रथा पूर्वी प्रचलित आहे. त्याचाच अध्याय म्हणून भारतीयांचे परदेशी स्विस बँकेत असणारे पैसे किती यावर या म्हणीचा दाखला दिला जातो. मात्र येणारी नवी आकडेवारी मात्र वेगळेच सांगत आहे. स्विस नॅशनल बँक (Swiss National Bank) ने आपली डेटाच्या माध्यमातून अधिकृत आकडेवारी जगासमोर आणली आहे. डेटात दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५ मधील ४२५ दशलक्ष स्विस फ्रँक (Swiss Frank) वरून घसरत आर्थिक २०२४ पर्यंत ३४६ दशलक्ष स्विस फ्रँकपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच गेल्या १० वर्षात १८% भारतीय खात्यांच्या पैसा घटला आहे असे डेटामध्ये म्हटले आहे.

 



एसएनबी (SNB) डेटानुसार, विशेष म्हणजे ठेवीत सर्वाधिक वाढ कोविड काळात झाली आहे. कोविड अखेरपर्यंत १० वर्षातील मुदत ठेवीत सर्वाधिक वाढ झाली होती जी तब्बल ६०२ दशलक्ष डॉलर्सवर होती. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये स्विस बँकेत भारतीय पैसा ३०९ दशलक्ष डॉलर्सवर होता जो आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत ३७ दशलक्ष स्विसने वाढत ३४६ दशलश स्विसवर गेला होता. जरी हा पैसा या एका आर्थिक वर्षात वाढला असला तरी मात्र गेल्या दहा वर्षांतील भारतीय ठेवीत घट झाली आहे.

युके नागरिकांच्या मुदतठेवीतही घट झाली आहे. आर्थिक २०१५ मधील ४४ अब्ज स्विस फ्रँकवरून आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत ३१ अब्ज स्विस फ्रँकवर पोहोचला आहे. चीनच्या ठेवीतही संख्यात्मक दृष्ट्या घट झाली आहे. गेल्या वर्षी चीनच्या ठेवीत ५.१% वरून ४.३% घट झाली आहे. इतर देशांच्या ठेवीमध्येही घट झाल्याचे निरिक्षण डेटामध्ये नोंदवले आहे.शेजारील पाकिस्तान व बांगलादेश यांच्या स्विस बँकेतील ठेवीतही लक्षणीयरीत्या घट झाली आहे. पाकिस्तानी ठेवीत २०१५ मधील ९४७ दशलक्ष स्विस फ्रँकवरून आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत २४१ दशलक्ष स्विस फ्रँकवर घसरण झाली आहे. जे जवळपास ७५% प्रमाण घसरणीचे आहे. बांगलादेश ठेवीत आर्थिक वर्ष २०१५ मधील १२.६ दशलक्ष स्विस फ्रँकवरून १२.६ दशलक्ष स्विस फ्रँकवर घसरण झाली जी जवळपास ७३% आहे. सौदी अरेबिया मुदत ठेवीत आर्थिक वर्ष २०१५ मधील ८.३ अब्ज स्विस फ्रँकवरून घसरत आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत ४.८ अब्ज स्विस फ्रँकवर पोहोचली आहे. सर्वाधिक घसरण अमेरिकन मुदतठेवीत झालेली आहे. आर्थिक वर्ष २०१५ ते २०२४ काळात अनुक्रमे ६४.२ वरून घसरत २४.४ स्विस फ्रँकवर ठेवी पोहोचल्या आहेत.

जगातील विविध जिओपोलिटिकल स्थितीमुळे, वाढलेल्या पारदर्शकतेमुळे, वाढलेल्या आंतरराष्ट्रीय नियमावलीमुळे तसेच विदेशी संबंध, आंतरराष्ट्रीय विनियोग अशा विविध कारणास्तव स्विस बँकेतील भारतासह इतर राष्ट्रांच्या गुंतवणूका कमी झालेल्या दिसल्या आहेत. एकूणच भारतच्या स्थितीवर बोलायचे झाल्यास कोविड काळातील अपवाद वगळता भारतीय ठेवीदारांच्या स्विस बँकेच्या ठेवीत घसरण झाली.
Comments
Add Comment

Gold Silver: स्वातंत्र्यदिनी सोने स्वस्त व चांदी महाग 'हे' आहे सविस्तर विश्लेषण

मोहित सोमण: जागतिक सोन्यात आज घसरण झाल्याने भारतातल्या सराफा बाजारातही सोन्याची किंमत घसरली आहे. काल सोन्याच्या

गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करणार

मुंबई : वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा

चीनमध्ये खळबळ सात महिन्यातील किरकोळ विक्री निचांकी पातळीवर!

मोहित सोमण: सोमवारी शेअर बाजारात फटका बसेल का? यावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज डोनाल्ड ट्रम्प आणि

रत्नागिरी : एसटी डेपोतच डिझेल चोरी, टँकरमध्ये छुपा कप्पा बनवून डिझेल चोरी

मंडणगडमध्ये एसटी डेपोतच डिझेल चोरीचा प्रकार समोर आला आहे. एसटी बससाठी डिझेल घेऊन आलेल्या टँकरमधूनच डिझेल चोरी

मुंबई, पुण्यानंतर नाशिक हे महाराष्ट्रातील तिसरं डेस्टिनेशन - छगन भुजबळ नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ चे उद्घाटन

सोलापूरच्या धर्तीवर नाशिक विमानतळासाठी उडान योजनेअंतर्गत ‘रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमसाठी प्रयत्न - छगन

Q1 Ashok Leyland Results: तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या नफ्यात जबरदस्त वाढ

प्रतिनिधी: हिंदुजा समुहाची प्रसिद्ध वाहन कंपनी अशोक लेलँड लिमिटेड (Ashok Leyland Ltd) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला