Stock Market Update: बाजारात गुंतवणूकदारांचा विश्वास! सेन्सेक्स व निफ्टीची उसळी सेन्सेक्स ३४१.६३ व निफ्टी ८९.९५ अंकाने उसळला, मात्र VIX ५.३५%

प्रतिनिधी: गिफ्ट निफ्टीच्या (Gift Nifty) मधील सकारात्मक संकेतानंतर बाजारात सकारात्मकता झळकत आहे. सकाळी गिफ्ट निफ्टीत ०.४२% वाढ झाल्याने बाजारात 'बुलिश' वातावरण कायम आहे. परिणामी सकाळी सुरुवातीलाच सेन्सेक्स (Sensex) ३४१.६३ अंकाने व निफ्टी ८९.९५ अंकाने उसळला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात (Sensex Bank Index) ९१.६९ अंकांने वाढ झाली असून बँक निफ्टी (Bank Nifty) २०२.९५ अंकाने वाढ झाली आहे. दोन्ही बँक निफ्टीत ०.१५ ते ०.४४% वाढ झाल्याने बाजारात बँक निर्देशांकात सुरूवातीच्या कलात चांगले संकेत मिळत आहेत. यामुळेच घसरत असलेला बँक निफ्टी आज उभारी धरेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


दुसरीकडे निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्ये जवळपास सगळ्याच निर्देशांकात वाढ झाल्याने बाजारातच होत सपोर्ट पातळीने उसळी घेतली. केवळ मिडिया (०.४२%) अपवाद वगळता सगळ्या निर्देशांकात वाढ
झाली. सर्वाधिक वाढ फायनांशियल सर्विसेस (Financial Services २५/५०) (०.६७%), एफएमसीजी (०.२६%), फार्मा (०.२९%), पीएमयु बँक (१.१०%), रिअल्टी (१.३१%), तेल व गॅस (०.४३%), फायनांशियल सर्विसेस एक्सबँक (०. ७७%) समभागात झाली आहे.


आज बीएसई (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३४ व ०.२८% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३९ व ०.२५% वाढ झाली आहे. आज बीएसईत सकाळच्या सत्रात ३१३९ समभाग (शेअर्स) पैकी २०४१ समभागात वाढ झाली आहे तर ९७१ समभागात घसरण झाली. एनएसईत २५०९ समभागापैकी १५८१ समभागात वाढ झाली आहे तर १०६४ समभागात घसरण झाली आहे.


आज सकाळच्या सत्रात प्रिमियर एनर्जी (५.२६%),पॉवर फायनान्स (३.३७%), नावा (२.८३%), एन्ड्यूरन्स टेक्नॉलॉजी (२.४६%), इंडियामार्ट इंटरनॅशनल (२.०५%), इंडस टॉवर (१.९१%), वरूण बेवरेजेस (१.४८%), नुवामा वेल्थ (१.३७%), आयडीबीआय बँक (१.०३%), इंडियन रिन्यूऐबल (२.७४%), सेंट्रल बँक (१.५६%), कॅनरा बँक (१.२९%), जिओ फायनांशियल (१.१८%) या समभागात वाढ झाली आहे.


तर सर्वाधिक घसरण सनटीव्ही नेटवर्क (३.७६%), हिरो मोटोकॉर्प (२.४३%), बँक ऑफ इंडिया (२.३८%), सिमेन्स (२.३६%), जिलेट इंडिया (२.१८%), बजाज ऑटो (२.१६%), सिमेन्स (२.४३%), बँक ऑफ इंडिया (२.०४%), इंटलॅक्ट डिजाइन (२.०१%, कल्पतरू (१.४९%), एल अँड टी माईंडट्री (२.२१%), बजाज फायनान्स (१.३३%), विप्रो (०.७४%), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (०.६२%), टेक महिंद्रा (०.५९%), अंबुजा सिमेंट (०.४७%), ब्रिटानिया (०.४२%), गोदरेज कंज्युमर प्रोडक्ट (०.४२), डिवीज (०.३५%), युनायटेड स्पिरीट (०.३४%), इन्फोसिस (०.२४%), एक्सिस बँक (०.२५%), हिन्दुस्तान एरोनॉटिक्स (०.०६%) या समभागात झाली आहे.


आज मध्यपूर्वेतील युद्धाचा व तेलाच्या सतत चढत्या दरामुळे बाजारात गुंतवणूक काय प्रतिसाद देतात हे कदाचित बँक निफ्टी व मिडकॅप व स्मॉलकॅपमधील हालचालीवर अवलंबून राहू शकतू.असे असताना ब्लू चिप्स कंपनीच्या सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा प्रतिसादही महत्वाचा असेल. मात्र वीआयएक्स (अस्थिरता निर्देशांक) सकाळी ५.३५% पातळीवर गेल्याने आज गुंतवणूकदारांना सतर्कता बाळगावी लागेल.एकूणच परिस्थि ती पाहता आज बाजारातील 'Bullish' ट्रेंड दुपारपर्यंत कायम राहतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ वी के विजयकुमार म्हणाले की, 'गेल्या महिनाभरापासून २४५००-२५००० च्या मर्यादेत व्यवहार करणारा निफ्टी नजीकच्या काळात याच मर्यादेत राहण्याची शक्यता आहे. इस्रायल-इराण संघर्ष कमी झाल्याच्या किंवा युद्ध अचानक संपल्याच्या बातम्यांमुळेच या मर्यादेचा वरचा भाग तुटेल. याबद्दल अनिश्चितता आहे. मर्यादेचा खालचा भाग तुटण्याची शक्यता नाही कारण मोठी खरेदी, विशेषतः देशांतर्गत संस्थांकडून, घसरणीमुळे दिसून येईल. जर युद्ध सुरू राहिले आणि क्रूड ८५ डॉलरच्या पुढे गेले तर मर्यादेचा खालचा भाग तुटेल.

कालच्या व्यापारात दिसून येणाऱ्या बाजाराच्या ट्रेंडचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे व्यापक बाजारपेठेतील कमकुवतपणा. निफ्टी जवळजवळ स्थिर राहिला, तर स्मॉलकॅप निर्देशांक २% ने घटला आणि SMIDs मध्ये मोठी घट झाली. व्यापक बाजारपेठेतील कमकुवतपणाचा हा ट्रेंड सुरूच राहण्याची शक्यता आहे कारण त्यांचे जास्त मूल्य आहे आणि चालू जोखीम-ऑफमुळे या विभागात आणखी विक्री होऊ शकते. जास्त मूल्य असलेल्या SMIDs मधून वित्तीय, औद्योगिक, ऑटो आणि रिअल इस्टेटमधील बऱ्यापैकी मूल्य असलेल्या, सुरक्षित लार्जकॅप्सकडे पैसे जाऊ शकतात.'
Comments
Add Comment

Nashik : कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल २८५ रुपये; पालेभाज्यांचे भाव गगनाला

Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी