Friday, October 24, 2025
Happy Diwali

धक्कादायक ! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर, नवी मुंबईत स्लॅब पडून शिक्षिकेला दुखापत...

धक्कादायक ! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर, नवी मुंबईत स्लॅब पडून शिक्षिकेला दुखापत...
नवीमुंबई : नेरुळ महानगरपालिकेच्या (Navi Mumbai Municipal Corporation School)  शाळेत धक्कादायक प्रकार घडल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  नवी मुंबईतील नेरुळ, सेक्टर ३० मध्ये महापालिकेच्या शाळेला १७ कोटी रुपये खर्च करुन नव्याने बांधकाम करण्यात आले होते. शाळेत शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवत असताना इमारतीच्या स्लॅबचा प्लास्टरचा भाग कोसळल्याने वर्गशिक्षिका थोडक्यात बचावली... नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा १६ जून रोजी सुरु झाली,  इयत्ता सहावीच्या वर्गात एकून ३६ विद्यार्थी होते,  शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवत असताना सॅल्बचा प्लस्टारचा भाग शिक्षिकेचा डोक्यावर पडला त्यामुळे शिक्षिकेला किरकोळ दुखापत झाली. विशेष म्हणजे शाळा सुरु होऊन फक्त चार दिवस झाले होते, त्यामुळे घडलेला प्रकाराबद्दल स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच याच इमारतीत आठवी आणि दहावीचे वर्ग सुरु करण्यात आल्याने इमारतीला काही भागात तडे देखील गेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे काही वर्गात पाणी जमा होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होताना पाहायाला मिळत आहे. मुळातच शालेच्या गच्चीवर प्लास्टिकच्या तीन टाक्या ठेवल्या आहेत, त्यातील एक टाकी तुटली आहे. गच्चीवर प्लास्टिकची टाकी न ठेवता सिमेंटची टाकी ठेवावी अस मत पालकांनी व्यक्त केलंय.  इमारतीचंं नव्याने करण्यात आलेले बांधकाम हे निष्कृष्ट दर्जाचे आहे अशी खंत पालकांनी व्यक्त केली. शालेय नियमानुसार शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा लावणे गरजेचे आहे. पण या ठिकाणी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशी तेथील स्थानिकांनी माहिती दिली.  तसेच निष्कृष्ट दर्जेचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी पालकांनी केली.              
Comments
Add Comment