पुण्यात संत तुकाराम महाराजांची पालखी, वाहतुकीत होणार मोठे बदल...

पुणे : संत तुकाराम  महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्काम असणार आहे, त्यामुळे पुणे पोलिस वाहतूक विभागाने मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.  वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीसांनी दिली.  पुणे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  पुणे शहरातील २० मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

त्यासाठी रस्त्यांवर १३५० पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. ज्या ठिकाणी पालखी मुक्कामी असणार आहे त्या ठिकाणी पूर्णपणे बंदी असणार आहे. पुण्यात संध्याकाळी नेहमीच फर्ग्युसन कॉलेज रोड आणि जंगली महाराज रोडवर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे बदल करणे गरजेचे आहे.  अशी माहिती वाहतुक पोलीसांनी दिली.

पुण्यात कुठे असणार वाहतूक बंदी ?

पुण्यातील गणेश खिंंड रस्ता पूर्णपणे बंद आहे. तसेच डेक्कन जिमखाना येथील खंडोजी चौक ते वीर चापेकर चौक, गाडगीळ पुतळा चौक, ते स गो बर्वे चौक, आपटे चौक, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, शनिवार चौक, सेवासदन चौक, नेहरु चौक, सोन्या मारुती चौक, संत कबीर चौक ते हलवाई चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.

तसेच हवामान खात्याच्या विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर २२ जून २०२५ रोजी दिवे घाट टेकडी भागत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दिवे घाटात २२ जून रोजी संध्याकाळी १२ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत दिवे घाट टेकडी परिसरात जाण्यास मज्जाव घालवण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

तणाव वाढला, तैवान जवळ पोहोचला चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा

तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला

ठाणे पोलिसांनी ज्येष्ठांसाठी विकसित केला ‘आधारवड’ मोबाइल अॅप

ठाणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या

सुबोध भावे साकारणार निम करोली बाबा

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी झेप घेत आहे. तो लवकरच येणाऱ्या

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...! महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात

सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित