
सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.२०%, ०.५५% वाढ झाली तर निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.४६%, १.१९% वाढ झाली आहे. आज खास म्हणजे वीआयएक्स (VIX India Volatility Index) म्हणजेच अस्थिरता निर्देशांकात ४.०८% घसरण झाल्याने बाजाराला मोठा सपोर्ट लेवल मिळाला आहे परिणामी बाजारातील समभागांच्या किंमती स्थिर राहण्यास मदत झाली होती.आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices)मध्ये जवळपास सर्व समभागात (Shares) मध्ये वाढ झाली आहे.सर्वाधिक वाढ रिअल्टी (२.११%),फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.८६%),मिडकॅप स्मॉलकॅप हेल्थकेअर (१.०२%)हेल्थकेअर (१.०७%), निफ्टी मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (१.८६%), निफ्टी मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.८७%),रियल्टी (२.११%) समभागात वाढ झाली आहे.वीआयएक्स सोडल्यास कुठल्याही समभागात आज घसरण पहावयास मिळाली नाही.
आज अखेरच्या सत्रात बीईएमएल लिमिटेड (८.९३%),जेबी केमिकल (५.९१%),एचडीएफसी बँक (१.५९%),इन्ड्युरन्स टेक्नॉलॉज (५.७७%),गो डिजिट जनरल (५.४३%),हुडको (५.०७%),गार्डन रिच (४.०९%),झी एंटरटेनमेंट (४.८६%) ,पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (४.७१%),ट्रेंट (३.९७%),जेएसबब्लू एनर्जी (३.४२%),महिंद्रा अँड महिंद्रा (३.०९%),जिओ फायनांशियल सर्विसेस (३.३४%),भारती एअरटेल (३.०६%),पंजाब नॅशनल बँक (३.००%),सी जी पॉवर (२.६७%) ,इन्फोऐज (२.४६%),वरूण बेवरेज (२.३१%),पॉवर ग्रीड (२.२९%),आयसीआयसीआय लोमबार्ड (२.२६%),एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (२.२४%),रिलायन्स इंडस्ट्रीज (२.२३%),कॅनरा बँक (२.२२%),श्रीराम फायनान्स (२.१७%),इंटरग्लोब एव्हिएशन (२.०१%),नेस्ले इंडिया (१.७९%),डीएलएफ (१.७१%),एबीबी इंडिया (१.७०%),होंडाई मोटर्स (५.०३%) समभागात वाढ झाली आहे.
तर सर्वाधिक घसरण काँकॉर्ड (६.८९%),इरीस लाईफसायन्स (६.२९%),इंटेललॅक्ट (५.६१%),जिलेट इंडिया (४.७२%),जेबीएम ऑटो (४.१४%),सेरा सॅनिटरी (३.७७%),असही इंडिया ग्लास (३.७२%),जेबीएम ऑटो (४.१४%), न्यूजेन सॉफ्टवेअर,थरमॅक्स (३.१९%),लिंडे इंडिया (३.१२%),ज्योती लॅब्स (३.१२%),एमआरएफ (२.७१%),कल्पतरू (२.६८%),सारेगामा इंडिया (२.६४%),बँक ऑफ इंडिया (२.१६%),सिमेन्स (२.१५%),जेके सिमेंट (२.०५%),रेडिंगटन (२.०२%), सारडा एनर्जी (२.००%),रामकृष्ण फोर्ज (१.७८%),श्री सिमेंट (१.४८%),अदानी पॉवर (१.१६%),हिरो मोटोकॉर्प (१.०४%),गोदरेज कंज्युमर (०.३९%),युनायटेड स्पिरीट (०.१३%), मारूती सुझुकी (०.१२%) या समभागात झाली आहे.
अनेक दिवसांच्या दबावाच्या परिस्थितीत बहुतांश ब्लू चिप्स कंपन्यांनी आज चांगली कामगिरी केली होती.एचडीएफसी,रिलायन्स,आयसीआयसीआय बँक,भारती एअरटेल यांसारख्या मोठ्या समभागात मोठी वाढ झाल्याने बाजाराला 'Mom entum ' मिळू शकला. याशिवाय आज जागतिक बाजारपेठेत रुपयांच्या तुलनेत डॉलरची घसरण झाली.डॉलर तुलनेत रूपया १३ पैशाने वधारल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.खासकरून मध्यपूर्वेतील संघर्ष तेजीत होता असतानाही भारतीय समभागांच्या 'Fundamental' वर बाजाराने भरोसा केल्याने बाजारात वाढ झाली.विशेषतः कालच्या तुलनेत मिडकॅप स्मॉलकॅपमधील वाढ झाल्याने आज दोन्ही घरगुती व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतव णूक कायम ठेवल्याची शक्यता आहे.विशेषतः आरबीआयच्या प्रोजेक्ट फायनांसिंग घोषणेनंतर बाजारातील बँक निर्देशांकात वाढ दिसून आली होती. मोठ्या प्रमाणात या शेअर्समध्ये वाढ झाल्याने बँक निर्देशांकात रॅली घडून आली होती. गुंतवणूक दारांनी या निर्णयाचे स्वागत केले कारण यामुळे प्रकल्पांच्या नंतरच्या टप्प्यात अधिक स्पष्टता,कमी तरतूद आणि आर्थिक ताण व्यवस्थापित करण्यासाठी एक संरचना स्पष्ट होते.
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने,चांदीत जबरदस्त घसरण झाली आहे.डॉलरच्या दरासोबत आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावात मागणी घटल्यानंतर आशियाई गुंतवणूकदारांनीही सोन्याकडे पाठ फिरवली आहे.सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम ६० ते ७० रूपयांनी घसरण झाल्याने बाजारातील सोन्याच्या दर कोसळले होते तर चांदीच्या दरातही तब्बल २००० रूपये घसरण झाल्यानंतर चांदीच्या भावातही धुळधाण उडाली.महत्वाचे म्हणजे सकाळी ४% हून अधिक कोसळलेला वीआयएक्स सत्रा अखेरीस आणखी १% घसरत ५.९३% पातळीवर पोहोचला होता.यामुळेच सेन्सेक्स व निफ्टीला कुठलाही धोका निर्माण झाला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारातील संध्याकाळपर्यंत परिस्थिती पाहता,युएस बाजारात देखील सोन्यात १.०३% घसरण झाली होती. तर चांदीत २.१५% घसरण झाली होती.आज युरोपियन बाजारातील निर्देशांकात तेजी कायम राहिली होती.तर युएस बाजारात Dow Jones Futures (०.६२%) वाढ,तर NASDAQ मध्ये (०.१३%) किरकोळ वाढ झाली होती. S&P 500 मध्ये (०.०३%) घसरण झाली आहे.आशियाई बाजारात संध्याकाळपर्यंत गिफ्ट निफ्टी सपाट राहिल्यानंतर Nikkei 225(०.२२%) घसरण तर Hang Seng (१.२४%) वाढला होता. Shanghai Composite निर्देशांकात संध्याकाळपर्यंत (०.०७%) घसरण झाली होती.आज आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावातून तयार होत असलेला संमिश्र कल आला असला तरी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने भारताच्या एनर्जी क्षेत्रातील केलेल्या शाश्वत विकासाच्या पार्श्वभूमीवर कौतुक केले होते. HDB Financial Services चा प्राईज बँड आज निश्चित करण्यात आला होता.बाजारातील आयपीओला मिळत असलेला प्रतिसाद पाहता बाजारातील दबावाची पातळी कमी करण्याचे काम म्युच्युल फंड,तसेच नवे घरगुती गुंतवणूकदार करत असतील अशी सध्याच्या घडीला शक्यता वर्तवली जात आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरान संदर्भात येत्या दोन आठवड्यात मोठा निर्णय घेऊ असे वक्तव्य केल्यानंतर बाजारात आशंका निर्माण झाला होती.
मात्र फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात झाल्यानंतर ही पहिल्यांदाच बाजारात मोठी वाढ झाल्याने बाजारात आश्वासक चित्र नक्कीच दिसत आहे. मात्र बाजारातील चढउतार हा नक्कीच चिंतेचा विषय आगामी काळासाठी असू शकतो.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले,' भारतीय रिजर्व बॅकेने under construction असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला बंद केलेला बॅकांचा कर्ज पुरवठा पुर्ववत सुरू केल्यामुळे बँक व इतर सर्व निर्देशांकाचे बहुतेक सर्व शेअर वाढले आहेत.व निर्देशांक जवळपास एक टक्क्याने वाढला आहे.परंतु कच्चे तेल ७२ डाॅलरच्यावर पोहोचले आहे डाॅलर ८६.५७ पर्यंत गेला आहे .या दोन्ही गोष्टी इकाॅनाॅमीसाठी मारकच आहेत. अजून ही अमेरिका प्रत्यक्ष युद्धात सहभागी दिसत नाही परंतु पुढील काही दिवसात युद्ध किती काल चालणार हे स्पष्ट होईल.विदेशी गुंतवणूकदारांकडून थोडीफार खरेदी होत आहे ही विशेष बाब आहे. हा आठवडा युद्धाच्या पार्श्वभूमीवर तरुन गेला हे महत्वपूर्ण आहेच. पुढील काही दिवसात बाजार आपली दिशा ठरवेल.तोपर्यंत वेट अॅण्ड वॉचची भूमिका असेल.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'भारतीय इक्विटी बेंचमार्क्सनी सत्राचा शेवट मजबूत पद्धतीने केला,संस्थात्मक संचयनामुळे निर्णायकपणे गंभीर प्रतिकार पातळी ओलांडली.निफ्टी ५० मानसिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण २५,००० च्या वर बंद झाला,जो तेजीचा वेग अधोरेखित करतो.बंदच्या वेळी, सेन्सेक्स १,०४६.३० अंकांनी किंवा १.२९% ने वाढून ८२,४०८.१७ च्या नवीन उच्चांकावर स्थिरावला,तर निफ्टी ५० ३१९.१५ अंकांनी किंवा १.२९% ने वाढून २५,११२.४० वर बंद झाला.संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून -परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII)आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII)सतत येणारा प्रवाह -प्रमुख टेलविंड्स म्हणून काम करत होता,प्रचलित भू-राजकीय अनिश्चिततेमुळे येणाऱ्या अडचणींना तोंड देत होता आणि रस्त्यावर सकारात्मक भावनांना बळकटी देत होता.क्षेत्रीय व्याप्ती स्थिरपणे सकारात्मक राहिली,सर्व निफ्टी निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले.निफ्टी रिॲलिटी ,टेलिकॉम पीएसयू बँका आणि फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपन्यांनी नेतृत्व केले, ज्यांनी १%-२% च्या श्रेणीत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली, जी व्यापक-आधारित जोखीम-आधारित भूक दर्शवते.व्यापक बाजारपेठांमध्ये सहभाग तितकाच मजबूत होता,बीएसई मिडकॅप निर्देशांक १.२०% वाढून ४५,४८०.२६ वर पोहोचला आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ०.५५% वाढून ५२,३७८.५२ वर बंद झाला, जे निरोगी बाजार व्याप्ती आणि भांडवलीकरणात गुंतवणूकदारांच्या मजबूत हिताचे संकेत देते.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की'अलिकडच्या सुधारात्मक एकत्रीकरणानंतर निर्देशांकाने एक मोठी बुल कॅन्डल तयार केली,ज्यामध्ये उच्च आणि उच्च कमी सिग्नलिंग पुन्हा सुरू झाले. प्र क्रियेतील निर्देशांक २५,००० पातळीच्या वर बंद झाला,जो सिग्नलिंग स्ट्रेंथ दर्शवितो.पुढे जाऊन,आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक अलिकडच्या पाच आठवड्यांच्या एकत्रीकरण झोनच्या वरच्या सीमेची पुन्हा चाचणी करेल,जो सध्या २५,२०० च्या जवळ आहे.या रेझिस्टन्स बँडच्या वर एक निर्णायक ब्रेकआउट नजीकच्या काळात २५,५०० झोनकडे वरच्या दिशेने विस्ताराचे दार उघडू शकतो.जोपर्यंत निर्देशांक मागील आठवड्याच्या २४,७०० च्या स्विंग नीचांकीपेक्षा वर टिकून राह तो, तोपर्यंत जवळच्या काळातील पूर्वाग्रह रचनात्मक राहण्याची अपेक्षा आहे.५०-दिवसांच्या EMA आणि गेल्या पाच आठवड्यांच्या एकत्रीकरण श्रेणीच्या खालच्या बँडचा संगम असल्याने २४,५००-२४,४०० झोनवर प्रमुख अल्पकालीन आधार ठेवण्यात आला आहे'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, बँक निफ्टीने उच्चांक आणि उच्चांक अशी एक तेजीची कँडल तयार केली आहे आणि ५६,००० च्या वर एक फर्म बंद होत आहे.आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक सकारात्मक पक्षपातीपणा कायम ठेवेल आणि येत्या आठवड्यात ५६,७०० आणि ५७,४०० च्या पातळीवर जाईल.तात्काळ पक्षपातीपणा ५५,५०० च्या वर सकारात्मक राहील. दैनिक १४ कालावधीच्या आरएसआयने खरेदी सिग्नल निर्माण केला आहे त्यामुळे निर्देशांकातील सकारात्मक पक्षपातीपणाची पुष्टी होते.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,'मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्यामुळे राष्ट्रीय इक्विटी निर्देशांकांमध्ये वाढ झाली आणि अमेरिकेने इराणशी संवाद साधण्याची अपेक्षा असल्याने तात्काळ लष्करी कारवाईचा धोका कमी झाला.या घडामोडीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सुधारणा झाली, ज्यामुळे देशांतर्गत बाजारपेठांना फायदा झाला आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या भावना वाढ ल्या.व्यापक बाजारपेठेत,व्हीआयएक्स निर्देशांक आणि खरेदीमध्ये जलद घसरण दिसून आली,ज्यामुळे वित्त,ऑटो आणि रिअल्टी सारख्या व्याजदर संवेदनशील आणि ग्राहकाभिमुख क्षेत्रांमध्ये आणि व्याजदर कपातीचे फायदे,चलनवाढीचा दबाव कमी होणे आणि ग्राहकांच्या खर्चात वाढ यामुळे पहिल्या तिमाहीत चांगले निकाल मिळतील अशी अपेक्षा होती.'
निफ्टीचा हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले'निफ्टीने तीन दिवसांच्या एकत्रीकरणानंतर झपाट्याने वाढ केली आणि त्याची अल्पकालीन तेजी पुन्हा सुरू केली.शिवाय,निर्देशांकाने २१ दिवसांचा EMA पुन्हा मिळवला आहे,जो वरच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आणखी गती प्रदान करू शकतो.आधार आता २४,८५० वर आहे आणि जोपर्यंत तो या पातळीच्या वर राहील तोपर्यंत निर्देशांक 'बाय ऑन डिप्स' राहील. वरच्या बाजूस, तो २५,३५० आणि त्याहून अधिक दिशेने पुढे जाऊ शकतो.'
आजच्या बाजारातील सोन्यावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आक्रमक भूमिकेमुळे एमसीएक्समध्ये सोन्याचे भाव कमकुवत झाले आणि ते सुमारे ५००-७५० ने घसरून सुमारे ९८,८०० वर आले.फेडने लवकरच व्याजदर कपातीची अपेक्षा मागे टाकली,ज्यामुळे कॉमेक्स सोन्याच्या किमतीतही अलिकडच्या काळात झालेली वाढ कमी झाली.तथापि,मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव,विशेषतः इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे सोन्याच्या किमतीत घट मर्यादित झाली आहे.अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित-आश्रय मागणी भावनांना आधार देत आहे.पुढे पाहता,अमेरिकेच्या व्यापार शुल्क आणि मध्य पूर्वेतील लष्करी सहभागावरील घडामोडी अस्थिरतेला चालना देतील.इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेकडून तणाव कमी होण्याची किंवा सहभाग न घेण्याची कोणतीही चिन्हे सोन्यावर दबाव आणू शकतात.दुसरीकडे,नवीन तणाव किमतींना आधार देत राहतील.नजीकच्या काळात सोन्याचा किमती ९७,५०० ते १,००,००० रूपयांच्या अस्थिर श्रेणीत व्यापार होण्याची अपेक्षा आहे.'