
Vivek Lagoo Passes Away: ज्येष्ठ नाट्य अभिनेते विवेक लागू यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे ते माजी पती होते. वृत्तानुसार, विवेक लागू यांनी (१९ जून २०२५) रोजी अखेरचा श्वास घेतला. विवेक लागू हे मराठी नाट्य जगतातील एक आदरणीय व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतही आपले योगदान दिले. त्यांची माजी पत्नी रीमा लागू यांच्यासोबत अभिनय क्षेत्रात त्यांची चांगली कारकीर्द होती.
अनेक प्रसिद्ध मालिका आणि चित्रपटांमध्ये विवेक लागू यांनी काम केलं आहे. 'व्हॉट अबाऊट सावरकर', 'अग्ली', '31 दिवस' या चित्रपटांममध्ये त्यांनी काम केलं असून, 'चार दिवस सासूचे' , 'हे मन बावरे' या गाजलेल्या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे.
रीमा लागू यांचे माजी पती

१९७६ मध्ये बँकेत काम करत असताना रीमा लागू आणि विवेक लागू या दोघांची पहिली भेट झाली, रंगभूमीवरील त्यांच्या प्रेमामुळे ते एकत्र आले. १९७८ मध्ये त्यांचे लग्न झाले. पण काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही विवेक आणि रीमा एकमेकांबद्दल आदर राखत होते. विवेक आणि रीमा यांना मृण्मयी लागू वैकुल ही मुलगी आहे. मृण्मयीने कुटुंबाचा कलात्मक वारसा पुढे नेला आहे. लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून तिने थप्पड आणि स्कूप सारख्या उत्तम चित्रपटांसाठी काम केले आहे.
अंतिम संस्कार कुठे केले जातील?
विवेक लागू हे मराठी चित्रपट आणि टीव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव होतं. विवेकच्या मृत्यूची बातमी सर्वप्रथम विकी लालवाणी यांनी सोशल मीडियावर शेअर केली. विवेक लागू यांचे अंत्यसंस्कार आज, (शुक्रवार, 20 जून 2025) ओशिवरा स्मशानभूमीत केले जातील.