मुंबई : अनेक वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (HSRP number plate) लावण्याची मुदत परिवहन विभागाने वाढवली आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. परंतू ही मुदतवाढ १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. वाहनधारकांना ही शेवटची संधी असल्याने वाहनधारकांनी त्वरित HSRP नंबरप्लेट बसवावी असं आव्हान परिवहन विभागाने केले आहे.
अनेक वाहनधारकांना HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी विलंब होत असून परिवहन विभागाच्या निदर्शनास आल्याने ही संधी शेवटची देण्यात आली आहे. यापूर्वी वाहनधारकांना ऑनलाईन बुकिंग तांत्रिक अचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे परिवहन विभागाने तांत्रिक अडचणींमधील दुरुस्ती करुन मुदतवाढ देण्यात आली . यापुढे मुदत वाढ देण्यात येणार नाही अशी देखील माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
यापूर्वी देखील HSRP नंबरप्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाकडून दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. पहिली मुदतवाढ ३० जून तर दुसरी मुदतवाढ ३० एप्रिल २०२५ पर्यंत देण्यात आली. परिवहन विभागाच्या आयुक्तांच्या माहितीनुसार १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या वाहनधारकांना अडणीत येत असतील त्यांनी जवळच्या अधिकृत सेंटरमध्ये संपर्क साधावा, संपर्क साधणं शक्य नसेल तर तर वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करावी. असे आवाहन परिवहन विभागाच्या आयुक्तांनी केलं आहे.