
जीवन आणि मृत्यूचा लढा: डीएनए प्रोफाइलिंगची कहाणी
अहमदाबाद : अहमदाबाद - लंडन एअर इंडिया विमान अपघातानं संपूर्ण देश हादरला. या भीषण अपघातात २७४ हून अधिक जणांनी प्राण गमावले. मृतदेहांचे कोळसे झाले. मृतांची ओळख पटवणं हे मोठं आव्हान निर्माण झालं. मात्र या संकटात एक आशेचा किरण ठरले ते भारताचे फॉरेन्सिक तज्ज्ञ. भारतात आतापर्यंतची सर्वात मोठी DNA जुळवणी मोहीम यशस्वीपणे राबवली गेली. चला तर जाणून घेऊया या लेखातून अशक्यप्राय मिशनची कहाणी, जिथे विज्ञान, मेहनत आणि माणुसकी एकत्र आली.अहमदाबाद विमान दुर्घटना भारताच्या इतिहासातील आणखी एक काळा दिवस. अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाईट AI १७१ चं विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच पडलं आणि आगीच्या ज्वाळांमध्ये लपटलं. एक हजार डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानामुळे प्रवाशांच्या मृतदेहांची ओळख पटवणं जवळपास अशक्य झालं. मात्र या संकटात भारताच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी एक चमत्कार घडवला. गांधीनगरच्या फॉरेन्सिक सायन्स डायरेक्टरेट आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या टीमने तातडीने कामाला सुरुवात केली. अपघातस्थळ सील करून ३०० हून अधिक नमुने गोळा केले. राजकोट, सुरत आणि वडोदऱ्याच्या फॉरेन्सिक लॅबमधून डीएनए मॅचिंग किट्स आणि उपकरणं आणली गेली. ४० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर्स आणि २०० कर्मचारी रात्रंदिवस हे मिशन यशस्वी करण्यासाठी धडपडत होते.

PMRDA : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो -३ला आणखी विलंब!
गारेगार प्रवाससाठी वर्षभर थांबाच! आयटी अभियंत्यांना थंडगार व आरामदायी प्रवासासाठी आणखी वर्षभर प्रतिक्षाच करावी लागणार आहे. कारण हिंजवडी ते ...