Saturday, October 25, 2025
Happy Diwali

India vs England: आजपासून भारत वि इंग्लंड कसोटीला सुरूवात, पाहा किती वाजता सुरू होईल सामना

India vs England: आजपासून भारत वि इंग्लंड कसोटीला सुरूवात, पाहा किती वाजता सुरू होईल सामना
मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून म्हणजेच शुक्रवार २० जूनपासून सुरूवात होत आहे. या मालिकेत पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडला हरवण्यासाठी सज्ज झाला आहे. लीड्समध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

किती वाजता सुरू होणार सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. तर सामन्याचा टॉस दुपारी तीन वाजता होईल. इंग्लंडने या सामन्यासाठी आधीच प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. तर भारताच्या प्लेईंग इलेव्हनची माहिती टॉरसनंतर समजेल.

जाणून घ्या संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी २० ते २४ जून - लीड्स दुसरी कसोटी २ ते ६ जुलै - एजबेस्टन तिसरी कसोटी १० ते १४ जुलै - लॉर्ड्स चौथी कसोटी २३ ते २७ जुलै - मँचेस्टर पाचवी कसोटी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट - ओव्हल

२००७ नंतर भारताने इंग्लंडमध्ये जिंकली नाही मालिका

भारताने इंग्लंडमध्ये शेवटची २००७मध्ये कसोटी मालिका जिंकली होती. ही मालिका राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारताने जिंकली होती. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत १३६ सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील ५१ सामने इंग्लंडने जिंकलेत तर ३५ सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. तर ५० कसोटी सामने अनिर्णीत राहिलेत.
Comments
Add Comment