लीड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी भारतीय संघ फलंदाजी करत असून भारताचा क्रिकेटर यशस्वी जायसवालने ऐतिहासिक शतक ठोकले आहे.
यशस्वी जायसवालच्या शतकाच्या जोरावर भारत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाताना दिसत आहे. यशस्वीने १६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४४ धावांवर आपले शतक पूर्ण केले. यशस्वीचे कसोटी करिअरमधील हे ५ वे शतक आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर पहिल्यांदा टीम इंडिया मैदानात उतरली आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. भारतीय संघाने २०० धावांचा टप्पा पार केला आहे.