
बीएनपी पारिबस (BNP Paribas), जेएम फायनांशियल लिमिटेड (JM Financial Services Limited),बोफा सिक्युरिटीज लिमिटेड (Bofa Securities Limited), गोल्डमन सच (Goldman Sachs),सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड (Securities Private Limited), एचएसबीसी सिक्युरिटीज व कॅपिटल मार्केट (HSBC Securities and Capital Market Limited),आयआयएफएल कॅपिटल सर्विसेस लिमिटेड (IIFL Capital Services Limited),जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Jefferies India Private Limited),मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (Morgan Stanley India Private Limited), मोतीलाल ओसवाल इनव्हेसमेंट अँडव्हायजर लिमिटेड (Motilal Oswal Inves tment Advisor Limited), नोमुरा फायनांशिल अँडव्हायजरी अँड सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Nomura Financial Advisory and Securities India Private Limited), नु्वामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (Nuvama We alth Management Limited),युबीएस सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (UBS Securities India Private Limited) या कंपन्या बुक लिडिंग मॅनेजर म्हणून आयपीओसाठी काम करतील. तर एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हे ट लिमिटेड (MUFG Intime India Private Limited) ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करेल.
कंपनीच्या माहितीनुसार हा आयपीओ १२५०० कोटींचा असू शकतो. यामध्ये २५०० कोटींचा आयपीओ हा फ्रेश इश्यू असणार आहे. यामध्ये १०००० कोटीची विक्री OFS (ऑफर फॉर सेल ) माध्यमातून होणार आहे.ओएफएससाठी एचडीए फसी बँकेचा समावेश आहे. २००७ साली या कंपनीचा उदय झाला होता. HDB Financial Services ही कंपनी मुख्यतः विना बँक वित्तीय संस्था (NBFC) आहे जी प्रामुख्याने किरकोळ ग्राहकांना (Retail Invest ors) ला आर्थिक सेवा प्रदान करते. याशिवाय कंपनीचा बीपीओ (Business Process Outsourcing BPO) चा व्यवसाय आहे. याशिवाय एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे ओम्नी-चॅनेल 'फिजिटल' वितरण मॉडेल एक मोठे शाखा नेटवर्क, इन-हाऊस टेलि-कॉलिंग टीम आणि विविध बाह्य वितरण नेटवर्क आणि चॅनेल भागीदारांसोबत कंपनी व्यवसाय व्यवस्थापन करते.
कंपनीकडून निव्वळ उत्पन्नाचा (Net Income) वापर कंपनीच्या टियर-१ कॅपिटल बेसमध्ये वाढ करण्यासाठी केला जाणार आहे, ज्यामुळे त्यांना एंटरप्राइझ लेंडिंग, असेट फायनान्स आणि कंझ्युमर फायनान्ससह त्यांच्या विविध व्यवसाय विभागांसाठी भविष्यातील भांडवली गरजा (Capex) पूर्ण करता येतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२४ मध्ये कंपनीला १४१७१.१२ कोटींचा महसूल मिळाला होता जो आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढत १६३००.२८ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax PAT) मध्ये आर्थिक वर्ष २०२४ मार्चमधील २४६०.८४ कोटीवरून घसरत आर्थिक वर्ष २०२५ मार्चमध्ये २१७५.९२ मिळाला आहे. कंपनीने म्हटल्याप्रमाणे, आयपीओतील निधीचा वापर भांडवली खर्चासाठी करण्यात येणार आहे. तसेच आपल्या उद्योगातील आर्थिक सेवा पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी करण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) या कंपनीचे अप्पर लेयर नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC-UL) म्हणून वर्गीकरण केले आहे. या आयपीओतील सबस्क्रिप्शनपूर्वीच कंपनीत (OFS) माध्यमातून ९४.३% भागभांडवल (Stake) एचडीएफसीने धारण केले आहे.
Gmp Details-
एका संकेतस्थळावरील माहितीनुसार, HDB फायनान्शियल सर्व्हिसेसचा IPO GMP आज +८३ (Plus 83) आहे.HDB फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअरची किंमत ग्रे मार्केटमध्ये ८३ च्या प्रीमियमवर व्यवहार करत असल्याचे समजले आहे. IPO किंमत पट्ट्याचा वरचा भाग आणि ग्रे मार्केटमधील सध्याचा प्रीमियम लक्षात घेता, HDB फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअरची अंदाजे लिस्टिंग किंमत ८२३ प्रति शेअर आहे मात्र ७४० रूपयांच्या आयपीओ मूळ किमतीपेक्षा ही ११.२२% जास्त किंमत आहे.