Saturday, October 25, 2025
Happy Diwali

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान

मुंबई : आगामी आषाढी एकादशी वारी करिता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या एकूण १४०० दिंड्यांना प्रति दिंडी २०,००० रुपये प्रमाणे २ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भातील १४ जून आणि १७ जून २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. वारी अनुदानासाठी निधी हा अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत वितरित करण्यात आलेला नसून सर्वसाधारण योजनेतील जाहिरात व प्रसिद्धी राखीव असलेल्या निधीतून उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गासाठी आरक्षित निधीवर कोणताही अन्याय झालेला नाही, असे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment