Friday, October 24, 2025
Happy Diwali

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रोचे नवे स्थानक उद्यापासून सुरु....

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रोचे नवे स्थानक उद्यापासून सुरु....
 पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पुण्यातील प्रवाशांसाठी मेट्रोचे नवे स्थानक खडकी उद्यापासून सुरु होणार आहे. हे नवीन स्थानक २१ जून रोजी प्रवासी सेवेत दाखल होणार आहे.  खडकी रेल्वे स्टेशनच्या जवळचं मेट्रो स्थानक असल्याने प्रवाशांना प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे. अनेक महिन्यांपूर्वीच मेट्रो खडकी स्थानकाचे काम झाले होते. यापूर्वी ही प्रवाशांनी खडकी मेट्रो स्थानक लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पुणेकरांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना अधिक सोयीस्कर आणि अखंड प्रवासाचा अनुभव घेता येईल. हे स्थानक सुरु झाल्यामुळे प्रवाशांना खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता अश्या महत्वाच्या ठिकाणी पोहचणे सोयीस्कर होणार आहे. पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी माध्यमांना माहिती देताना म्हणाले, पुण्यातील प्रवाशांनी खडकी रेल्वे स्थानक कधी सुरु होणार आहे, अशी वारंवार विचारणा केली होती. मुळातच, खडकी मेट्रो स्थानक उद्या सुरु झाल्यानंतर कामानिमित्त जाणाऱ्या लोकांना खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता या ठिकाणी प्रवासासाठी खडकी स्थानकाचा फायदा होणार आहे.            
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >