Saturday, October 25, 2025
Happy Diwali

गौतमी पाटील आणि निक शिंदे एकत्र झळकणार! “सुंदरा” गाण्याचे टीझर प्रदर्शित

गौतमी पाटील आणि निक शिंदे एकत्र झळकणार! “सुंदरा” गाण्याचे टीझर प्रदर्शित

गौतमीचं ठसकेबाज नृत्य आणि निकची खतरनाक हुकस्टेप साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “सुंदरा” गाण्याचा टीझर भेटीला

New Song's Teaser: गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी “सुंदरा” हे रोमॅंटिक गाणे घेऊन येत आहे. नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरची माहिती नृत्यांगना गौतमी पाटील आणि अभिनेता निक शिंदे याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. या टीझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

रूपवान देखणी, जणू ती स्वर्गाची अप्सरा, मराठमोळा साजशृंगार करी, जणू ती स्वप्नातील “सुंदरा” असे सुंदर कॅप्शन असलेली पोस्ट त्यांनी सोशल मिडियावर शेयर केली आहे.   या गाण्यात निकसोबत गौतमी दिसणार असल्यामुळे हे गाणे जबराट असणार आहे, यात काही शंका नाही.

साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “सुंदरा” गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी हे गाणं गायलं असून वैभव देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. विजय बुटे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत दिलं आहे. रोहित नागभिडे यांनी ख्वाडा, टीडीएम, लगन अश्या अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. संगीत नियोजन सिद्धांत बोरावके याने केले आहे. हे गाणं २३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >