ईडीला दिल्लीत आढळला २००० कोटींचा नवा ‘क्लासरुम घोटाळा’

मनिष सिसोदिया आणि सत्येंद्रनाथ जैन यांना पाठवले नव्याने समन्स


नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारुवरील अबकारी कर घोटाळ्यामुळे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि कॅबनेट मंत्री सत्येंद्रनाथ जैन यांना ईडीने तुरुंगात धाडले होते. पण आता पुन्हा एकदा मनिष सिसोदिया आणि सत्येंद्रनाथ जैन यांना ईडीने समन्स पाठवले आहे. यावेळी ईडीला २००० कोटींचा नवा घोटाळा आढळला असून हा ‘क्लासरुम घोटाळा’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी एसीबीने मनीष सिसोदिया यांची तीन तासांहून अधिक वेळ चौकशी केली. सिसोदिया सकाळी ११ वाजता एजन्सीसमोर हजर झाले आणि दुपारी २:३० च्या सुमारास निघून गेले.


या २००० कोटी रुपयांच्या या ‘दिल्ली क्लासरूम बांधकाम घोटाळा’ प्रकरणी १८ जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने दिल्लीतील ३७ ठिकाणी शोधमोहीम राबवली. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२च्या तरतुदींनुसार ही शोधमोहीम राबविण्यात आली. दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी शाखेने याप्रकरणी मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या पीडब्ल्यूडीने २०१५ ते २०२३ दरम्यान १२,७४८ हून अधिक अतिरिक्त वर्गखोल्यांच्या बांधकामात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ईडीने दावा केला आहे.



ईडीच्या मते, २,४०५ वर्गखोल्यांची आवश्यकता असताना, योग्य मंजुरीशिवाय प्रकल्पाची व्याप्ती मनमानीपणे वाढवून आधी या खोल्या ७,१८० आणि नंतर १२,७४८ खोल्यांपर्यंत वाढविण्यात आली. यामुळे प्राधान्यक्रम १ आणि प्राधान्यक्रम २ या टप्प्यांमधील खर्चात ४९.०३ टक्क्यांपर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे. याप्रकरणी केलल्या छापेमारीत ईडीने खाजगी कंत्राटदारांकडून या घोटाळ्याचे पुरावे जप्त केले, ज्यात दिल्ली सरकारच्या मूळ विभागीय फायली आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचे रबर स्टॅम्प यांचा समावेश असल्याचं म्हटलं आहे.


दरम्यान, कामगारांच्या नावाने ३२२ बनावट बँक खाती तयार करण्यात आली असून यामध्ये सार्वजनिक निधी वळवण्यात आल्याचा आरोपही ईडीने केला आहे. याशिवाय विविध खाजगी कंत्राटदार आणि बनावट संस्थांचे बनावट लेटरहेडही याठिकाणी सापडले आणि जप्त करण्यात आले आहे. या लेटरहेडचा वापर बनावट खरेदी रेकॉर्ड आणि बनावट खरेदी बिले तयार करण्यासाठी केला जात होता. त्याचबरोबर जीएनसीटीडी विभागांना सादर केलेल्या बनावट पावत्यांशी संबंधित पुरावे देखील सापडले असून ते ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. तपासणी दरम्यान अनेक बनावट कंपन्या आढळून आल्या आहेत.

Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षक दिनानिमित्त देशभरातील ४५ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक

...म्हणून एअर इंडियाच्या १६१ प्रवासी असलेल्या विमानाचे तातडीने लँडिंग

इंदूर : एअर इंडियाच्या इंदूर - दिल्ली विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उड्डाण करुन विमान दिल्लीच्या

मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे,