Beacon Unveils: कॅनडामधील अनिवासी भारतीयांचा युपीआयद्वारे घरी पैसे पाठ्वण्याकडे कल- अहवाल

मुंबई: कॅनडामधील भारतीयांना सेवा देणाऱ्या बीकन या विदेशी फिनटेक प्लॅटफॉर्मने कॅनडातील अनिवासी भरातीयांमध्ये (एनआरआय NRI) युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरातील काही महत्वाच्या ट्रेंडबाबत काही दखलपात्र निरीक्षणे नोंदवली आहेत. निरीक्षणात व्यासपीठाने म्हटले आहे की,'अनिवासी भारतीय देशाबाहेरची पेमेंट (Payment) आणि भारतातील आर्थिक जबाबदाऱ्या यांचे व्यवस्थापन करण्यासाठी जी पद्धत वापरत होते, त्यात मूलभूत परिवर्तन (Transformation)आले आहे.


बीकनच्या (Beacon) विश्लेषणातून दिसून येते की भारतात युपीआय हा जणू यूझर्सचा (Users) दुसरा स्वभाव बनला असल्यामुळे, विशेषतः अलीकडे स्थलांतरित झालेल्या एनआरआयमध्ये देखील हा स्वभाव ठळकपणे जाणवतो कारण त्यांनाही आपल्या घरी पैसे पाठवण्यासाठी, खर्चाच्या व्यवस्थापनासाठी तशीच सुलभता (Convienece) आणि गती (Fast Transaction) हवीहवीशी वाटत असते.युपीआय आता जुन्या एनआरआयच्या देखील अंगवळणी पडू लागले आहे, कारण प्राप्तकर्ता,मग तो कुटुंबीय असो, घरमालक असो किंवा कुणी सेवा प्रदाता असो, बँक खाते क्रमांकाची नाही, तर युपीआय आयडीचीच मागणी करतात.याबदलामुळे आर्थिक व्यवहाराच्या पद्धतीत लक्षणीय परिवर्तन आले आहे आणि यूझर्स पूर्वीप्रमाणे एकदाच मोठ्या रकमेत पैसे पाठवण्याऐवजी नेमक्या रकमेचे आणि वारंवार व्यवहार करणे पसंत करत आहेत. असे केल्यामुळे मोठ्या रकमेत कमी वेळा पैसे पाठवण्याच्या तुलनेत कॅश फ्लोचे अधिक चांगले व्यवस्थापन होऊ शकते आणि एनआरआय भारतातील आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांशी अधिक निगडीत राहू शकतात.


बीकनचे सह-संस्थापक आदित्य म्हात्रे यांनी सांगितले की, 'मी स्वतः भारतातून कॅनडामध्ये स्थलांतरित झालो आहे, त्यामुळे तेथील अर्थी व्यवस्थापन करण्यातील आव्हाने काय असतात हे मी स्वतः जाणतो. एनआरआयद्वारे युपीआयचा अंगिकार पिढीतले अंतर स्पष्ट करते. नवी पिढी आर्थिक स्वायत्तता आणि डिजिटल-फर्स्ट विचाराकडे झुकणारी आहे. आमचा प्लॅटफॉर्म युपीआय इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून कॅड-ते-आयएनआर पेमेंटचे संधान साधून ह्या परिवर्तनास बळकटी देतो, ज्यामुळे पारंपरिक बँकिंग द्वारा जागतिक भारतीय समुदायांवर लावलेले अवरोध दूर होतात.


बीकनच्या संशोधनातून स्पष्ट होते की, कॅनडामधील ७०% पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी भारतातील आर्थिक व्यवहार करण्यासाठी आता मोबाइल-फर्स्ट फिनटेक व्यासपीठ (प्लॅटफॉर्म्स) पसंत करू लागले आहेत. भारतीय विद्यार्थी एनआर आय हे कॅनडातील आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्रिय, डिजिटलदृष्ट्या मूळ निवासी वर्गाचे प्रतिनिधित्व करतात आणि स्थानिक पातळीवर तसेच सीमा पार पैसे पाठवण्यासाठी लवचिकता,गती आणि नियंत्रणाची अपेक्षा ठेवतात. कॅनडामधील भारतीयांची संख्या झपाट्याने वाढत १.८५ मिलियन वर पोहोचली आहे,जी कॅनडाच्या एकूण लोकवस्तीची ५.१% आहे.भारतातून येणाऱ्या स्थायी निवासींची संख्या २०१३ मध्ये अंदाजे ३३००० ने वाढून २०२३ मध्ये १४०००० वर पोहोचली.ही
वाढ ३२६% आहे. केवळ २०२४ मध्येच भारतात कॅनडाच्या नवीन नागरिकांचे प्रमाण सुमारे २३.४% आहे, जे एकंदर ८७,८०० लोक आहेत.


बीकनच्या निरक्षणांमधून स्पष्ट होते की, एनआरआय युपीआयचा सर्वाधिक उपयोग आपल्या कुटुंबाला पैसे देण्यासाठी, घरमालकाला घरभाडे देण्यासाठी, विविध बिले भरण्यासाठी, शाळा-कॉलेज व ट्यूशनची फी भरण्यासाठी, वैद्यकीय खर्चासाठी आणि केअरटेकर, ड्रायव्हर स्थानिक सल्लागार वगैरे सेवा प्रदात्यांचे पेमेंट करण्यासाठी करतात. बीकनचा प्लॅटफॉर्म कॅनडामधील यूझर्सना २१,००० पेक्षा जास्त भारतीय बिलांचे पेमेंट थेट कॅनेडियन डॉलरमध्ये करण्याची सुविधा देतो. ही सुविधा भारतातील येस बँक आणि भारत बील पे यांच्यासोबत केलेल्या भागीदारीमुळे (Partnership) शक्य झाली आहे.


दस्तावेजीकरण (Documentation), किमान बॅलन्स, करातील गोंधळ, आणि कमजोर डिजिटल अनुभवांनी त्रासलेले पारंपरिक एनआरइ/एनआरओ खात्यांचे एनआरआयधारक आता झटपट, पारदर्शक आणि मोबाइल-फर्स्ट उपाय शोधत आहेत. ही गरज पूर्ण करण्यासाठी बीकनसारख्या प्लॅटफॉर्मवर आधारित युपीआय त्यांचा पसंतीचा पर्याय बनला आहे.

Comments
Add Comment

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन