Saturday, October 25, 2025
Happy Diwali

अ‍ॅक्सिओम-४ मिशन २२ जूनला लाँच होणार नाही, लवकरच होणार नव्या तारखेची घोषणा

अ‍ॅक्सिओम-४ मिशन २२ जूनला लाँच होणार नाही, लवकरच होणार नव्या तारखेची घोषणा

नवी दिल्ली: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अ‍ॅक्सिओम-४ मिशनची तारीख परत पुढे ढकलण्यात आली आहे. हे मिशन २२ जूनला लाँच होणार नाही.नासाकडून या मिशनला ही स्थगिती देण्यात आली आहे. लवकरच याची नवी तारीख जाहीर केली जाणार आहे.

याआधी वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे मागील काही दिवसांत ही मोहीम वारंवार पुढे ढकलली जात होती. आधी प्रतिकूल हवामानामुळे, नंतर यानातील वायू गळती सुरू झाल्याचे लक्षात आल्यामुळे मोहीम पुढे ढकलण्यात आली होती.

मोहीम सुरळीत आणि सुरक्षितरित्या व्हावी यासाठी खबरदारी घेतली जात आहे. किरकोळ चूक नंतर जीवघेणी ठरू शकते. यामुळेच तांत्रिक दोष लक्षात येताच ते दूर करण्यासाठी मोहीम काही काळ पुढे ढकलली होती.

 

अ‍ॅक्सिओम-४ मिशनमध्ये भारताचे शुभांशू शुक्ला तसेच पोलंड, हंगेरी आणि अमेरिकेचे अंतराळवीर आहेत. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे राष्ट्रीय अंतराळवीर आहेत. याआधी १९८४ च्या एप्रिल महिन्यात रशियाच्या यानातून भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. यामुळे भारतीयांचे लक्ष अ‍ॅक्सिओम-४ मिशनकडे आहे.

भारतीय हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला तीन इतर क्रू मेंबर्ससोबत स्पेस मिशन, Axiom-4 चा भाग बनण्यासाठी तयार आहे. हे मिशन म्हणजे भारतासाठी एक मैलाचा दगड ठरेल. Axiom-4मिशनची क्रू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा प्रवास करणार आहे. १४ दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. यात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील वैज्ञानिक प्रयोग, शैक्षणिक प्रसार आणि व्यावसायिक उपक्रमांबाबत संशोधन होणार आहे. मिशन अ‍ॅक्सिओम स्पेसच्या 'Axiom-4' मोहिमेअंतर्गत लाँच केले जाईल. ज्याला 'मिशन आकाश गंगा' असेही म्हटले जात आहे. Axiom-4 (अ‍ॅक्स-४) मध्ये,चार देशांचे चार अंतराळवीर १४ दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत.शुभांशू हे आयएसएसमध्ये जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील. यापूर्वी राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळ यानातून अंतराळात प्रवास केला होता.
Comments
Add Comment