Yoga Day: मंत्रालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

मुंबई: सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day 2025) साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने राज्य सरकारच्या वतीने विधान भवन आणि मंत्रालयात आज योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.


मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. ‘इन्स्टिट्युट ऑफ योगा’ यांच्या सहयोगाने आयोजित या प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, इन्स्टिट्युट ऑफ योगाचे सह संचालक ऋषी योगेश यांच्यासह विविध विभागांचे सचिव, उपसचिव, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी इन्स्टिट्युट ऑफ योगाच्या मार्गदर्शकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच योगाच्या महत्त्वाविषयी माहिती दिली. यावेळी पर्वतासन, शवासन यासारख्या योगांची प्रत्यक्षिके उपस्थितांनी केली. तसेच अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धामध्ये सुवर्ण पदक विजेते मंत्रालयीन अधिकारी जगन्नाथ लांडगे, दत्ताराम सावंत आणि योगिता जाधव यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली.
Comments
Add Comment

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील