लवकरच इराणमध्ये सत्तांतर होणार, मोहम्मद रझा पहलवींचे वंशज देशाचे नेतृत्व करणार ?

  80

तेहरान : इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाची तीव्रता वाढू लागली आहे. अमेरिका इस्रायलला इराण विरुद्धच्या संघर्षात मदत करत आहे. आवश्यकता भासल्यास इस्रायलसोबत इराण विरुद्धच्या लढाईत उघडपणे लढण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. इस्रायलने आवश्यकता भासल्यास अली खमेनेई यांना मारणार, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे इराणमध्ये लवकरच सत्तांतर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनेई (Ali Hosseini Khamenei) इराण सोडावे लागेल अथवा त्यांची हत्या केली जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. अली खमेनेई यांची जागा रिक्त झाल्यानंतर इराणचे नेतृत्व पुन्हा एकदा इराणचे शेवटचे शहा मोहम्मद रझा पहलवी (Mohammad Reza Pahlavi) यांच्या वंशजाकडे अशी चर्चा आहे.

शहा मोहम्मद रझा पहलवी इराणचे नेतृत्व करत होते त्या काळात देशात आधुनिकतेचे वारे वाहू लागले होते. यामुळे इराणचे शेवटचे शहा मोहम्मद रझा पहलवी यांच्या वंशजाकडे नेतृत्व गेले तर पुन्हा एकदा इराणमध्ये आधुनिकतेचे वारे वाहू लागतील, अशी आशा व्यक्त होत आहे. इराणच्या शेवटच्या शहाच्या वंशजाने इराणला उद्देशून एक भाषण केले आहे. प्रसारमाध्यमांनी हे भाषण प्रसारित केले आहे. 'इस्लामिक प्रजासत्ताक कोसळत आहे. भविष्य उज्ज्वल आहे आणि एकत्रितपणे आपण इतिहासाची पाने उलटू' असे इराणच्या शेवटच्या शहाचे वंशज म्हणाले. या भाषणामुळेच इराणमध्ये सत्तांतर होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

इराणचे शेवटचे शहा मोहम्मद रझा पहलवी हे १९७९ मध्ये इस्लामिक क्रांतीने देश ताब्यात घेतल्यावर इराणमधून पळून गेले. त्यांचे १९८० मध्ये इजिप्तमध्ये निधन झाले. त्यांचा मुलगा, रझा पहलवी, मयूर सिंहासनाचा वारस होता. पण देशाबाहेर असल्यामुळे त्यांना इराणचे नेतृत्व करणे अद्याप शक्य झालेले नाही. रझा पहलवी अमेरिकेत आहे.
Comments
Add Comment

न्यूयॉर्कमध्ये भारतीयांना घेऊन जात असलेल्या बसला अपघात, पाच ठार

न्यूयॉर्क : अमेरिकेतून एक दुःखद बातमी आली आहे. न्यूयॉर्क राज्य महामार्गावर एका बसचा अपघात झाला. नायगरा

अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांवर धोक्याची टांगती तलवार, नियमांचे उल्लंघन केल्यास रद्द होणार व्हिसा

वॉशिंग्टन: अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा तिथे व्हिसावर वास्तव्यास असलेल्या ५.५ कोटी परदेशी नागरिकांच्या

दक्षिण अमेरिकेत ८ रिश्टर क्षमतेचा भूकंप

वॉशिंग्टन डीसी : भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजून ४६ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेत ८.० रिश्टर क्षमतेच्या

'श्री गणेश करूया...' म्हणत रशियन राजदूताने सुरू केली अमेिरकेवर टीका

भारत संबंधांवर परिणाम होणार नसल्याची रशियाकडून हमी मॉस्को : रशियाकडून भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाची आयात

गाझा पट्टीत इस्रायलचे सैनिक, गाझा ताब्यात घेणार

गाझा : इस्रायलच्या सैन्य तुकड्या गाझा पट्टीत घुसू लागल्या आहेत. शक्य तितक्या लवकर संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात

युद्ध संपणार! पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील भेट लवकरच, व्हाईट हाऊसमध्ये बैठकीनंतर ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी