Video | तिसऱ्यांदा अपयश! एलन मस्कच्या स्पेसएक्स स्टारशिपमध्ये भीषण स्फोट!

  74

टेक्सास : एलन मस्क यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्पेसएक्स स्टारशिप’ प्रकल्पाला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. टेक्सासमध्ये बुधवारी झालेल्या स्टॅटिक फायर टेस्टदरम्यान स्टारशिपमध्ये जोरदार स्फोट झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, रॉकेटच्या तळाशी झालेल्या स्फोटाने संपूर्ण परिसर धुराने आणि आगीने व्यापलेला दिसतो आहे.


स्थानिक पोलिसांनी स्फोटाची माहिती देत सांगितले की, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. तरीही या घटनेच्या कारणाचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.


ही चाचणी केवळ इंजिन तपासणीसाठी होती आणि त्यावेळी रॉकेट जमिनीवर स्थिर होते. मात्र, तपासणीदरम्यान अचानक प्रचंड स्फोट झाला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला.





याआधीही स्पेसएक्सच्या या स्टारशिप प्रणालीला अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. ‘सुपर हेवी बूस्टर’ आणि ‘स्टारशिप स्पेसक्राफ्ट’ यांचा एकत्रित चाचणी प्रक्षेपणादरम्यान तिसऱ्यांदा अपयश आले. याआधी जानेवारी आणि मार्चमध्येही अशाच प्रकारे रॉकेट अपयशी ठरले होते.


अंदाजे ४०० फूट उंच असलेले हे रॉकेट भविष्यात पृथ्वीभोवती, चंद्रावर आणि शेवटी मंगळावर मानवी आणि मालवाहतूक करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. मस्क यांच्या दीर्घकालीन अवकाश मोहिमेचा हा महत्त्वाचा भाग मानला जातो.



स्पेसएक्सच्या वेबसाइटवर आणि सोशल मीडियावर लाइव्हस्ट्रीमद्वारे दाखवण्यात आलेल्या फुटेजनुसार, पहिल्या टप्प्यातील सुपर हेवी बूस्टर प्रक्षेपणानंतर काही क्षणातच तो फुटला. दुसऱ्या टप्प्यातील स्टारशिपला उड्डाणादरम्यान इंधन गळती झाली आणि रॉकेटने नियंत्रण गमावले. परिणामी, पुन्हा वातावरणात परतताना ते पूर्णतः नष्ट झाले.


तरीही या अपयशांवर न थांबता स्पेसएक्स आपल्या चाचण्या सुरू ठेवणार आहे. “प्रत्येक उड्डाण हे शिकण्यासाठी एक संधी आहे,” असं स्पेसएक्सकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


एलन मस्क यांची ही महत्त्वाकांक्षी मोहीम अजूनही यशापर्यंत पोहोचलेली नाही, पण त्यांच्या चिकाटीने आणि प्रयोगशीलतेने अंतराळ संशोधनाला एक नवा वेग मिळतोय, हे मात्र निश्चित.

Comments
Add Comment

न्यूयॉर्कमध्ये भारतीयांना घेऊन जात असलेल्या बसला अपघात, पाच ठार

न्यूयॉर्क : अमेरिकेतून एक दुःखद बातमी आली आहे. न्यूयॉर्क राज्य महामार्गावर एका बसचा अपघात झाला. नायगरा

अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांवर धोक्याची टांगती तलवार, नियमांचे उल्लंघन केल्यास रद्द होणार व्हिसा

वॉशिंग्टन: अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा तिथे व्हिसावर वास्तव्यास असलेल्या ५.५ कोटी परदेशी नागरिकांच्या

दक्षिण अमेरिकेत ८ रिश्टर क्षमतेचा भूकंप

वॉशिंग्टन डीसी : भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजून ४६ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेत ८.० रिश्टर क्षमतेच्या

'श्री गणेश करूया...' म्हणत रशियन राजदूताने सुरू केली अमेिरकेवर टीका

भारत संबंधांवर परिणाम होणार नसल्याची रशियाकडून हमी मॉस्को : रशियाकडून भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाची आयात

गाझा पट्टीत इस्रायलचे सैनिक, गाझा ताब्यात घेणार

गाझा : इस्रायलच्या सैन्य तुकड्या गाझा पट्टीत घुसू लागल्या आहेत. शक्य तितक्या लवकर संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात

युद्ध संपणार! पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील भेट लवकरच, व्हाईट हाऊसमध्ये बैठकीनंतर ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी