शरीर साक्षात परमेश्वर

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत रूपे अनंत वेषे अशी परमेश्वराची रूपे आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे मोजताही येणार नाही इतकी अगणित ब्रह्मांड आहेत. आपल्या सूर्यासारखे अनंत सूर्य आहेत असे आता शास्त्रज्ञ सांगत आहेत. आपल्याला एकच सूर्य माहीत आहे. अनेक ग्रह आहेत. अनेक उपग्रह आहेत. हे सगळे ज्याने निर्माण केले, जिथून निर्माण झाले तो परमेश्वर. त्याने असे कधी म्हटले आहे का की हे मी निर्माण केले. हे सगळे ऐश्वर्य माझे आहे असा अहंकार त्याने कधी केला आहे का ? हे सगळे ऐश्वर्य, हा निसर्ग हे सर्व काही माझे आहे असा अहंकार तो कधी करत नाही. त्याच्या ठिकाणी इतके ज्ञान आहे, इतके दिव्य ज्ञान आहे पण मी ज्ञानी आहे असे कधी तो म्हणत नाही.


नाहीतर आपल्याकडे नुसता पदवीधर झाले तरी मी कुणीतरी मोठा असे समजायला लागतो. अरे पण त्या परमेश्वराच्या ठिकाणी ज्ञान, दिव्य ज्ञान इतके आहे की आपल्याला त्याची कल्पनाही करता येणार नाही. जसे त्याचे बाकी सर्वच अनंत आहे तसे त्याच्या ठिकाणी असलेले ज्ञानही अनंत आहे. एवढे ज्ञान त्याच्या ठिकाणी असूनसुद्धा त्याला त्याचा अहंकार नाही. तुम्ही म्हणाल त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे हे कशावरून ? जगांत सर्व ठिकाणी व्यवस्था आहे यावरून. जगांत जी सर्व ठिकाणी व्यवस्था आहे ती जरी पाहिली तरी त्याच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानाची, दिव्य ज्ञानाची तुम्हाला कल्पना येईल. आपल्या शरीराकडे जरी पाहिले तरी आपल्याला त्याची कल्पना येईल. आपण आपल्या शरीराकडे जसे कौतुकाने पाहायला हवे तसे पाहत नाही. आपल्या शरीरात जी व्यवस्था आहे ती पहिली तरी डोळे, नाक, कां, एकेक अवयव म्हणजे सुंदर अशी व्यवस्था आहे. दात तोंडात उमलतात कसे ? जशी एखादी कळी उमलावी तसे हे दात तोंडात उमलतात. जीभ, पडजीभ, हिरड्या हे सर्व येतात कुठून ? कळी उमलावी तसे हे तोंडात सर्व उमलत जाते. तिथे काहीही अव्यवस्था नाही. सगळी सुंदर अशी व्यवस्था आहे. आपल्या शरीराकडे जरी पहिले तरी आपले शरीर ही दिव्य व्यवस्था आहे म्हणून मी शरीर साक्षात परमेश्वर असा सिद्धांत मांडला. शरीराचे बाह्यांग इतके दिव्य आहे. अंतरंग सोडाच, बाह्यांगच इतके दिव्य आहे. आत गेलात तर ते हृदय, यकृत, फुफुसे , किडनी, ते रक्त कसे निर्माण होते ? रक्ताचा पुरवठा कसा होतो ? यांत किती व्यवस्था आहे हे पाहिले तर हे सर्व दिव्य आहे. हे कुणीही मी निर्माण केले असे म्हणू शकत नाही. रक्त मी निर्माण केले असे आपण म्हणू शकतो का ? रक्ताचे अभिसरण मी करतो असे आपण म्हणू शकत नाही. कारण हे सर्व आपोआप चाललेले आहे.

Comments
Add Comment

Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा या गोष्टी, होईल पैशांचा वर्षाव

मुंबई: घराची उत्तर दिशा 'या' वस्तूंनी सजवल्यास होईल धनलाभ वास्तुशास्त्रानुसार, घराची उत्तर दिशा ही धन आणि

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,

पितृऋण

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे हिंदू धर्माने सांगितलेली चार ऋणे म्हणजेच देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण.

विश्वामित्र

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी विश्वामित्रांच्या चरित्राला किंबहुना सर्वच ऋषीवरांच्या चरित्राला असलेल्या

खरे शहाणे

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै जीवनविद्येचे कार्य क्रांतिकारक आहे. क्रांतिकारक म्हणजे काय तर लोकांची मानसिकता

देवाणघेवाण

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात