Sunday, October 26, 2025
Happy Diwali

पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये स्वतंत्र संशोधन केंद्र सुरु, सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांची माहिती...

पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये स्वतंत्र संशोधन केंद्र सुरु, सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांची माहिती...
महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कलांचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी राज्य सरकाने स्वतंत्र कला अकदामी केंद्र सरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पु. ल. देशपांडे कला अकदामीमध्ये स्वतंत्र संशोधन केंद्र सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांनी  दिली. महाराष्ट्राला कलांचा वैभवशाली वारसा  लाभलेला असून, त्यात आणखीन नाविन्यपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सांस्कृतिक विभागाकडे नाटक, लोककला संस्कृती, संगीत अशा अनेक कलांची माहिती उपलब्ध आहे. परंतू वेगवेगळ्या विभागात त्याचे  वर्गीकरण  होऊन त्याचा अनेक कलाकरांना, बाहेरील विद्यार्थ्यांना, संशोधन करणाऱ्यांना  अभ्यास करता येणारा  असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. तसेच जे विद्यार्थी  पिचडी करत असतात त्यांना या विभागाचा नक्कीच फायदा होणार असल्याचा विश्वास देखील आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय...त्यामुळे या विषयाबाबत आज सांस्कृतीक कार्यमंत्री ॲड आश‍िष शेलार यांनी विभागाची मंत्रालयात बैठक घेऊन घोषणा केली. तसेच या संशोधन केंद्राचा प्रारुप आराखडा तयार करण्याचे निर्देश विभागाला दिले. या बैठकीला सांस्कृतिक कला संचनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्या विभागाचे सबंधति अध‍िकारी, लोककलांचे अभ्यासक प्रकाश खांडगे यावेळी उपस्थ‍ित होते.      
Comments
Add Comment