Monday, January 19, 2026

पहिल्या कसोटीपूर्वी करुण नायर दुखापतग्रस्त; भारतीय संघाची चिंता वाढली

पहिल्या कसोटीपूर्वी करुण नायर दुखापतग्रस्त; भारतीय संघाची चिंता वाढली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका शुक्रवारपासून सुरू होत आहे. त्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी आली आहे. जवळपास ८ वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची आशा बाळगणारा करुण नायर दुखापतग्रस्त झाला आहे.

पहिल्या कसोटीपूर्वीच यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या कसोटीपूर्वी करुण नायर नेटमध्ये सराव करत होता. यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज कृष्णा याचा एक चेंडू त्याच्या बरगड्यांना लागला. हा चेंडू त्याच्या बॅटला चुकवून थेट त्याच्या बरगड्यांना लागला. यामुळे त्याला दुखापत झाली आहे.

आता त्याच्या उपलब्धतेबद्दल शंका आहे की, तो इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळू शकेल की नाही ? करुण नायरच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. तो लीड्स कसोटीसाठी तंदुरुस्त असेल की, नाही हे देखील सांगण्यात आलेले नाही.

जर त्याची दुखापत गंभीर ठरली तर ती केवळ त्याच्यासाठीच नाही तर संघासाठीही मोठी समस्या ठरणार आहे.

Comments
Add Comment