Friday, August 15, 2025

Israel-Iran War: इराण-इस्त्राईल संघर्षात अमेरिका घेणार उडी, ट्रम्प यांनी दिली प्लानला मंजुरी

Israel-Iran War: इराण-इस्त्राईल संघर्षात अमेरिका घेणार उडी, ट्रम्प यांनी दिली प्लानला मंजुरी

तेहरान: इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष हा सातव्या दिवशीही सुरूच आहे. एकीकडे इस्त्रायल तेहरानमध्ये विविध भागात एअर स्ट्राईक करत आहे तसेच त्यांच्या अणुकेंद्रांना लक्ष्य करत असल्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे इराण इस्त्रायलव लाँग रेंज बॅलेस्टिक मिसाईल डागत आहे. आता दोन्ही देशाच्या संघर्षात अमेरिकेची एंट्री होणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. त्यांना अखेरचा आदेश देण्यासाठी थांबण्यास सांगितले आहे. ट्रम्प यांनी वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात त्यांनी हल्ल्याला मंजुरी दिली आहे. ते म्हणाले की शेवटचा आदेश आल्यानंतर हल्ला केला जाईल. दरम्यान, इराण आपला न्यूक्लियर प्रोग्राम सोडण्यास तयार आहे की नाही हे पाहण्यासही सांगितले.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची होणार बैठक

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद शुक्रवारी एक तातडीची बैठक घेणार आहे. इराणने या बैठकीला विरोध करताना म्हटले की या युद्धात अमेरिका सरळ भागीदार आहे.आणि याच कारणामुळे परिस्थिती भयानक झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा