इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर!

वॉशिंगटन डीसी : इराण इस्त्रायल यांच्यातील संघर्ष युद्धात परिवर्तीत झाला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर घातक हल्ले करण्यात येत आहेत. अलीकडेच इराणच्या सैन्याने इस्त्रायलमधील बीर्शेबा येथील एका हॉस्पिटलला टार्गेट केले. या हल्ल्यात हॉस्पिटलचे प्रचंड नुकसान झाले असून कमीत कमी ६५ जण जखमी झाल्याचे इस्त्रायली आपत्कालीन सेवेकडून सांगण्यात आले.या सर्व घडामोडीवर आता अमेरिकेने संयुक्त अरब अमीरात, सौदी अरब आणि जॉर्डनसह इतर मध्य पूर्वेतील देशांमध्ये ४० हजार सैन्य जवानांना अलर्टवर ठेवले आहे.


इराण- इस्त्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणच्या शेजारील मुस्लीम देश आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये ४० हजार सैन्य जवानांना अलर्टवर ठेवले आहे. यामध्ये संयुक्त अरब अमीरात, सौदी अरब आणि जॉर्डनसह मध्य पूर्वेतील देशांचा समावेश आहे. इतर अमेरिकन अधिकारी अशा ठिकाणांची माहिती घेत आहेत जिथे इराण हल्ला करू शकते. मध्य पूर्व आणि आसपास अमेरिकन सैन्याचे जवळपास २० तळ आहेत. त्यातील बहुतांश सैन्य तळ इराणी बॅलेस्टिक मिसाईलच्या रेंजमध्ये आहेत. इराणविरोधातील यु्द्धात उतरताच सर्वात आधी सीरिया, इराक आणि अरब देशांतील त्यांच्या सैन्य तळांना टार्गेट केले जाऊ शकते अशी शंका अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अमेरिका या सैन्य तळांवर अमेरिकन जवान तैनात ठेवले आहेत. अमेरिकेने युरोपात १८ रिफ्लुलिंग एअरक्राफ्ट्स पाठवले आहेत. जे लढाऊ विमानाच्या मदतीसाठी सज्ज राहतील. त्यासोबतच अमेरिकेने २ मालवाहू युद्धनौका मध्य पूर्व सागरी क्षेत्रात पाठवल्या आहे.



दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. परंतु याबाबत अंतिम आदेशाला अद्याप मंजुरी दिली नाही. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून इराणच्या हालचालींवर बारीक लक्ष आहे. त्यातच अमेरिकेने इराणविरोधात डाव आखणे सुरू केले आहे. इराणच्या शेजारील मुस्लीम देशांसोबत मिळूनच अमेरिका इराणविरोधात चक्रव्यूह आखत आहे. इस्त्रायल आणि इराण युद्धात अमेरिकेचे सैन्य उतरले तर इराणही अमेरिकेवर पलटवार करू शकतो हे अमेरिकेला माहिती आहे. इराण जवळच्या देशांमधील अमेरिकन बेसवर हल्ला करू शकते. त्यातूनच वाचण्यासाठी अमेरिकेने मुस्लीम देशांमध्ये पूर्ण तयारी केली आहे.

Comments
Add Comment

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

थायलंड  : बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई  : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो  : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक अनुभवाची संधी! युनेस्कोचा इंटर्नशिप प्रोग्राम, आताच करा अर्ज

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. युनेस्कोने

भारतानंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तानचे पाणी अडवणार!

काबूल : भारतानंतर आता तालिबानशासित अफगाणिस्तान पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा मर्यादित करण्याची आणि नदीवर धरणे

रशियातील महत्त्वाच्या दोन तेल कंपन्यांवर ट्रम्पचे निर्बंध, रशियावर येणार आर्थिक दबाव! भारतालाही बसणार का फटका?

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर आर्थिक दबाव आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.