Saturday, August 2, 2025

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी पाणी प्यायले पाहिजे.


रात्रभर झोपल्यानंतर आपले शरीर थोडे डिहायड्रेट होते. अशातच सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्यास शरीर पुन्हा ताजेतवाने होते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. तसेच दिवसाची सुरूवातही चांगली होते.


आता अशातच प्रश्न आहे की सकाळी उठल्यावर किती पाणी प्यायले पाहिजे?



किती पाणी प्यावे


तज्ञांच्या मते सकाळी उठल्यावर १ अथवा २ ग्लास पाणी पिणे चांगले असते. यामुळे शरीर पुन्हा हायड्रेट होते. तसेच पचनसंस्था सुधारते, मेटाबॉल्जिम बूस्ट होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. तसेच मेंदू आणि शरीर दोन्ही अॅक्टिव्ह राहते.



कसे पाणी प्यावे?


सकाळी उठल्यानंतर कधीही थंड पाणी पिऊ नका. याच्याऐवजी कोमट अथवा रुम टेम्परेचर असलेले पाणी प्या. हे तुमच्या शरीरासाठी लाभदायक आहे.



एकाच वेळेस खूप पाणी नको


सकाळी पाणी पिणे चांगली गोष्ट आहे. मात्र खूप पाणी एकत्र पिणेही योग्य नाही. यामुळे पोटात गॅस अथवा जळजळ होऊ शकते. हळू हळू आणि आरामात पाणी प्या.


पाणी नेहमी बसून आणि हळू हळू प्यायले पाहिजे. या पद्धतीने पाणी प्यायल्याने शरीरास अधिक फायदे मिळतात.


सकाळी उठताच १ ते २ ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीर संपूर्ण हलके आणि ताजेतवाने राहते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >