Wednesday, July 9, 2025

Monsoon Update : मुसळधार पावसानं अनेक ठिकाणांना झोडपलं; २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Monsoon Update : मुसळधार पावसानं अनेक ठिकाणांना झोडपलं; २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात अनेक ठिकाणांना झोडपल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, गुरुवारी (दि.१९) पहाटेपासूनच पुण्यासह परिसरात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचेही दिसून आले आहे. भारतीय हवामान विभागानेही पुढील २ दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.


भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण किनारपट्टी आणि पावसाची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. सह्याद्री पर्वत रांगेत मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.



कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि कोकण प्रदेशात तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.



सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट


मध्य व उत्तर भारतातील काही राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. भारताचा बराचसा भाग हा मान्सूनने व्यापला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनरपट्टी, मुंबई, ठाण्यात अति मुसळधार पाऊस होऊ शकतो. राज्यातील कोकण, पुणे, सातारा, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



पाटण तालुक्यातील पूल गेला वाहून


सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने पाटण तालुक्यातील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे चिपळूण कराड वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याकडे जाण्यासाठी भोर आणि ताम्हिणी घाटाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर कोल्हापूरला जायचं असल्यास रत्नागिरी आणि देवरुख या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा