
मुंबई : शहरात शाळा पुन्हा सुरू होताच परवाना नसलेल्या, सुरक्षाहीन स्कूल व्हॅन्स पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत.
स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी ही माहिती दिली असून, या व्हॅन्समध्ये महिला अटेंडंट नसतात, प्रवाशांची संख्याही परवानगीपेक्षा अधिक असते आणि अनेक वाहनांकडे फिटनेस, विमा आणि परवाना नसतो. असोसिएशननं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून लवकरच राज्य सरकारकडे अधिकृत तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
?si=GAW4iOphej2WOJRe
मुंबईत सध्या प्रमाणित स्कूल बसपेक्षा २.५ पट अधिक व्हॅन्स व खासगी गाड्या विद्यार्थ्यांना वाहून नेत आहेत. काही भागात शाळा अगदी आतमध्ये असल्याने मोठ्या बस जाणे शक्य नसते, म्हणून व्हॅन्स वापरल्या जातात. पण सुरक्षा नियमांचा भंग खपवून घेतला जाऊ शकत नाही.

मुंबईत १९ नवीन कोविड रुग्ण; ३१ मृत्यूंपैकी ६ मुंबईत पुणे : महाराष्ट्रातील कोविडच्या नव्या लाटेमागे कोणता प्रकार कारणीभूत आहे, यावर प्रकाश टाकणाऱ्या ...
पालकांच्या मते, शाळेपासून जवळ राहताना देखील फ्लॅट बस फीमुळे त्यांना पर्यायी मार्ग वापरावे लागतात. काहीजण रिक्शामध्ये ५–६ मुलं कोंबून पाठवत असल्याचे उघड झाले आहे.