Monday, October 20, 2025
Happy Diwali

मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयात तरुणीने केली आत्महत्या

मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयात तरुणीने केली आत्महत्या
मुंबई : साठ्ये महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत २१ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव संध्या पाठक असे आहे. पण संध्याने आत्महत्या केलेली नाही, तिच्या बाबतीत घातपात झाला असावा, असा संशय पाठक कुटुंबाने व्यक्त केला आहे. संध्या पाठक ही साठ्ये महाविद्यालयात स्टॅटिस्टिक्स (अंकशास्त्र) विभागात तिसऱ्या वर्षाला शिकत होती. ती गुरुवार १९ जून २०२५ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली. पण महाविद्यालयाच्या सकाळच्या सत्राची लगबग सुरू असताना संध्याने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, संध्याने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. यामुळे ती गंभीर जखमी झाली. संध्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तिने प्राण सोडले. घटनेची माहिती महाविद्यालयाच्या प्रशासनाने पोलिसांना दिली. संध्याने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. पण पाठक कुटुंबाने वेगळा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. महाविद्यालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले जाणार असल्याचे वृत्त आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >