Friday, October 24, 2025
Happy Diwali

पश्चिम रेल्वे दोन अतिजलद साप्ताहिक विशेष गाड्या चालवणार

पश्चिम रेल्वे दोन अतिजलद साप्ताहिक विशेष गाड्या चालवणार

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वे वांद्रे टर्मिनस-वीरंगणा लक्ष्मीबाई झांसी आणि वांद्रे टर्मिनस-सुभेदारगंज स्थानकांदरम्यान दोन अतिजलद साप्ताहिक विशेष गाड्या चालवणार आहे.

ट्रेन क्रमांक ०२२०० वांद्रे टर्मिनस-वीरांगना लक्ष्मीबाई झांसी अतिजलद विशेष दर शनिवारी वांद्रे टर्मिनस येथून ५.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ५.०० वाजता वीरांगना लक्ष्मीबाई झांसी येथे पोहोचेल. ही ट्रेन ५ जुलै ते २७ सप्टेंबरपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०२१९९ विरांगना लक्ष्मीबाई झांसी-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल दर गुरुवारी विरांगना लक्ष्मीबाई झांसी येथून संध्याकाळी ४. ५० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४. १० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन ३ जुलै ते २५ सप्टेंबरपर्यंत धावेल.

ही ट्रेन बोरीवली, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, गोध्रा, दाहोद, रतलाम, नागदा, उज्जैन, माकसी, बिओरा राजगढ, चाचौरा बिनागंज, रुथियाई, गुना, शिवपुरी, ग्वाल्हेर, डबरा आणि दतिया स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये एसी २-टायर, एसी ३-टायर, एसी ३-टायर (इकॉनॉमी), स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच आहेत.

ट्रेन क्रमांक ०४१२६ वांद्रे टर्मिनस - सुभेदारगंज सुपरफास्ट स्पेशल ही गाडी दर मंगळवारी वांद्रे टर्मिनस येथून सकाळी ११.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.०० वाजता सुभेदारगंजला पोहोचेल. ही ट्रेन ०८ जुलै ते ३० सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०४१२५ सुभेदारगंज-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल दर सोमवारी सुभेदारगंज येथून ५.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी ९.३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन ७ जुलै ते २९ सप्टेंबर पर्यंत धावेल. ही ट्रेन बोरिवली, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर सिटी, बयाना, रुपबास, फतेहपूर सिक्री, ईदगाह, तुंडला, इटावा, गोविंदपुरी आणि फतेहपूर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये एसी ३-टायर, एसी ३-टायर (इकॉनॉमी), स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच आहेत.

तथापि, ८ जुलैची ट्रेन क्रमांक ०४१२६ आणि ०७ जुलै २०२५ ची ट्रेन क्रमांक ०४१२५ मध्ये फक्त एसी ३-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील.

Comments
Add Comment