'बिनशर्त शरणागती' ट्रम्प यांची इराणला उद्देशून नवी सोशल मीडिया पोस्ट

वॉशिंग्टन डी. सी. : ट्रुथ या सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवी पोस्ट टाकली आहे. यात 'unconditional surrender' अर्थात 'बिनशर्त शरणागती' असे दोनच शब्द नमूद आहेत. ही पोस्ट इराणला उद्देशून करण्यात आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनेई (Ali Khamenei) यांना जीवंत राहायचे असल्यास इराणने बिनशर्त शरणागती मागावी, अशा स्वरुपाची ही पोस्ट असल्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे.

इराण नव्याने तयार करत असलेल्या अण्वस्त्रांमुळे आमच्या सुरक्षेला धोका आहे, अशी भूमिका घेत इस्रायलने इराण विरुद्ध हवाई हल्ले सुरू केले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर देणे सुरू आहे. इस्रायल प्रामुख्याने इराणची सैन्य शक्ती कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे तर इराण इस्रायलमध्ये कधी नागरी वस्तीवर तर कधी सैन्याशी संबंधित आस्थापनांवर हल्ले करत आहे. इस्रायलने अली खमेनेई यांना ठार मारण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे. याआधी इस्रायलने इराणच्या अनेक सैन्याधिकाऱ्यांना आणि गुप्तचर अधिकाऱ्यांना ठार केले आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांची 'unconditional surrender' अर्थात 'बिनशर्त शरणागती' ही नवी सोशल मीडिया पोस्ट आली आहे.

इस्रायलने १७ - १८ जूनच्या रात्री इराणची राजधानी असलेल्या तेहरान तसेच इराणच्या लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या आस्थापनांना आणि सैन्य तळांना लक्ष्य करुन मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमुळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अधिकृत सरकारी माहिती अद्याप आलेली नाही. पण इराणवरील इस्रायलचे हल्ले तीव्र झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्ट केली.

"आम्हाला माहित आहे की तथाकथित 'सर्वोच्च नेता' कुठे लपला आहे. तो एक सोपे लक्ष्य आहे, परंतु तिथे सुरक्षित आहे - आम्ही त्याला बाहेर काढणार नाही (मारणार नाही!), किमान सध्या तरी नाही," असे ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले. यानंतर अजून एक सोशल मीडिया पोस्ट टाकत त्यात ट्रम्प यांनी 'unconditional surrender' अर्थात 'बिनशर्त शरणागती' हे दोनच शब्द नमूद केले आहेत.

 
Comments
Add Comment

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने