या तारखेला असणार भारत-पाकिस्तान यांच्यातील २०२६ टी-२० वर्ल्डकप सामना, पाहा वेळापत्रक

मुंबई: २०२६मध्ये होणाऱ्या टी-२० महिला वर्ल्डकपचे यजमानपद इंग्लंड करत आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार स्पर्धेचा पहिला सामना यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जाईल. टी-२० वर्ल्डकपचे आयोजन १२ जून ते ५ जुलै पर्यंत असेल. भारतीय संघाचा पहिला सामना १४ जूनला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. वर्ल्डकपमध्ये एकूण १२ संघ सहभाग घेतील. यातील ६-६ ग्रुप दोन संघात विभागला जाणार आहे.


१२ संघांना ६-६ मध्ये विभागले जाईल. प्रत्येक ग्रुपमध्ये टॉप २ मध्ये असणाऱ्या संघांना सेमीफायनलमध्ये एंट्री मिळेल. भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियासह इतर २ क्वालिफाय करणाऱ्या संघांना ग्रुप ए मध्ये ठेवण्यात आले आहे.


तर ग्रुप बीमध्ये इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, श्रीलंका आणि इतर दोन क्वालिफाय करणाऱ्या संघांना स्थान मिळेल.


वर्ल्डकप स्पर्धेसाठी एकूण ६ मैदानांची निवड करण्यात आली आहे. यात लॉर्ड्स, द ओव्हल, एजबेस्टन, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राऊंड, ब्रिस्टॉल काऊंटी ग्राऊंड आणि हॅम्पशायर बॉल मैदान आहे. भारतीय वेळेनुसार हे सामने दुपारी ३ वाजता, संध्याकाळी ७ वाजता आणि रात्री ११ वाजता सुरू होतील.



वर्ल्डकपसाठी भारताचे वेळापत्रक


२०२६ महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना १४ जूनला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. १७ जूनला त्याच ग्रुप एमध्ये क्वालिफाय करणाऱ्या संघाशी होईल. तर २१ जूनला त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. २५ जूनला त्यांचा सामना दुसऱ्या क्वालिफायर संघाशी होईल. टीम इंडियाचा शेवटचा ग्रुप सामना २८ जूनला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत