Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Health: दह्यात मीठ टाकून खावे की साखर? जाणून घ्या काय योग्य ते

Health: दह्यात मीठ टाकून खावे की साखर? जाणून घ्या काय योग्य ते
मुंबई: दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. दिवसा दही खाणे शरीरास आरोग्यदायी मानले जाते. अनेक पदार्थ बनवण्यासाठीही दह्याचा वापर केला जातो. दरम्यान, याच्या सेवनाबाबत मात्र नेहमीच संदिग्धता असते की दह्यात मीठ टाकावे की साखर...

दह्यात मीठ टाकून खाल्ल्याने हे होतात परिणाम

मीठ मिसळल्याने दह्यातील चांगले बॅक्टेरिया संपतात. यामुळे दह्याच्या सेवनाने शरीरास तितका लाभ होत नाही. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर दह्यामध्ये मीठ टाकून खाऊ नये. यामुळे शरीरास नुकसान होते. आयुर्वेदानुसार दह्यामध्ये मीठ टाकून खाल्ल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतात. पित्ताची समस्या वाढू शकते. अशातच पित्ताची समस्या असलेल्या लोकांनी दह्यात मीठ टाकून सेवन करू नये.

दह्यासोबत साखर किती फायदेशीर

दह्यामध्ये साखर मिसळून खाणे लोकांना आवडते. याचा शरीरावरही परिणाम दिसतो. यामुळे पचनसंस्थेला सपोर्ट मिळतो. साखरेमुळे दह्यातील चांगले बॅक्टेरिया संपत नाहीत. साखर मिसळून गोड दही खाल्ल्यास पोटाची जळजळ कमी होण्यास मदत होते. दह्यात साखर मिसळून खाल्ल्यास बॉडीला हाय कॅलरीज मिळतात. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. डायबिटीज असलेल्या लोकांनी गोड दही खाऊ नये. यामुळे ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होऊ शकतो.

असे करावे सेवन

दह्यामध्ये चवीसाठी तुम्ही किंचित मीठ अथवा साखर टाकू शकता. मात्र तुम्हाला काही त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे. यामुळे शरीरास नुकसानही होऊ शकते. आरोग्य तज्ञांच्या मते दह्याच्या सेवनाने शरीरास अनेक लाभ मिळू शकतात. अशातच साखर अथवा मीठ न घालता दही खाल्ल्यास त्याचे अधिक फायदे होतात.  
Comments
Add Comment