अलिबाग : अलिबाग मुंबई पुणे दृतगती मार्गावर (mumbai pune express highway) भीषण अपघात झाला. या अपघातात सात ते आठ वाहने एकमेकांना धडकली, महत्वाचे म्हणजे यात पोलसांचे एक वाहन होते. अपघातात सहा पोलीस आणि पाच बांगलादेशी (Bangladeshi) नागरिक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबई – पुणे दृतगती मार्गावर भातान बोगद्यात पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक कंटेनर आडवा झाला होता. पोलिसांमार्फत कंटेनर काढण्याचे काम सुरु असताना पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने कंटेनरला धडक दिली.
टेम्पोच्या मागून अतिशय वेगात येणारी वाहने एकमेकांवर आदळली.यात मुंबई पोलिसांच्या वाहनाचा देखील समावेश आहे. पोलीस वाहनामध्ये घुसखोरी बांगलादेशी नागरिक होते. संबंधित बांगलादेशींना पोलीस घेऊन जात असताना, अपघातात बांगलादेशी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबई आणि वसई – भाईंदर येथून पोलिसांनी बांगलादेशींना ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिसांचा ताफा पुण्याच्या दिशेने निघालेला होता. अपघातानंतर दृतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. अपघातात पोलीस वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून, दृतगती मार्गावरील वाहने सुरुळीत सुरु आहेत...