Friday, October 24, 2025
Happy Diwali

नांदेडच्या भक्ताकडून माउलींना 1 कोटी सोन्याचा मुकुट अर्पण

नांदेडच्या भक्ताकडून माउलींना 1 कोटी सोन्याचा मुकुट अर्पण
पुणे: आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिरात नांदेड येथील भक्ताकडून एक कोटी रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे. या सोन्याचे वजन तब्बल एक किलो आहे. चार महिन्यांच्या अथक परिश्रमातून हा मुकुट तयार केला गेला असल्याची माहिती आहे. भारत रामिनवार आणि मीरा रामिनवार यांनी हा सोन्याचा अलंकारिक मुकुट माऊलींना अर्पण केला. हा मुकुट तयार करण्यासाठी चार महिन्यांचा अवधी लागला असल्याचे बोलले जात आहे, यामध्ये पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची कोरीव रचना आणि आधुनिक थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वारकरी परंपरेशी नाते असलेल्या कुशल कारागिरांनी हा मुकुट भक्तिभावाने घडवला. मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण इत्यादी मंगल प्रतीके पाहायला मिळतात. हा मुकुट मंगळवारी (दि. १७) माउलींना अर्पण करण्यात आला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >