कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते येथे धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशात अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या झाली. विजेचा शॉक देऊन विद्यार्थ्याला ठार करण्यात आले. ही हत्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने केली. मदरसा बंद राहावा आणि सुटी मिळावी, घरी जाता यावे या उद्देशाने एका अल्पवयीन विद्यार्थ्याने दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या केली. फैजान नाजिमा असे मृताचे नाव आहे. तो ११ वर्षांचा होता.
ज्या मदरशात हत्येची घटना घडली तिथे ८० जण शिकत आहेत. यापैकी ७० जण बिहारचे आहेत. हत्या झालेला फैजान नजीमा बिहारचा होता आणि हत्या करणारा पण बिहारचाच आहे. हत्या करणाऱ्याने घरी जाता यावे म्हणून गंभीर गुन्हा केला. या प्रकरणात पोलिसांनी हत्या करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. हत्या करणाऱ्याची चौकशी सुरू आहे. पोलीस हत्या प्रकरणी तपास करत आहेत. ताब्यात घेतलेल्या मुलाने गावी जाता यावे म्हणून इलेक्ट्रिक वायरने फैजानला शॉक दिल्याची कबुली दिली.