बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'अल्याड पल्याड’ पुन्हा चित्रपटगृहात

  70

मुंबई : सध्या जुने चित्रपट पुनः प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. एक वर्षापूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवणारा एस.एम.पी प्रोडक्शनचा ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट ही वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. एक पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या टीमने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. कॅप्शनमध्ये वर्षपूर्तीनंतर पुन्हा येतोय आपल्या भेटीला ‘अल्याड पल्याड’ २७ जूनपासून असं म्हटलं आहे.

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा ही निर्मात्यांनी केली होती. मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांच्या प्रेमळ आग्रहाखातर हा चित्रपट २७ जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखल होतोय. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांची तर दिग्दर्शन प्रीतम एसके पाटील यांनी केले आहे.

मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा,चिन्मय उदगीरकर,भाग्यम जैन,अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला वेगळीच रंगत आणली होती. या चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले होते. आता हीच मजा परत अनुभवायला मिळणार आहे.

याबाबत आनंद व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर म्हणाले की, आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता की, या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं त्याचं यश आम्हांला मिळालं. आज पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करता येतोय याचा आनंद आहे. यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत. आम्हाला परत एकदा तोच अनुभव आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल याची खात्री आहे.
Comments
Add Comment

सिनेमाचा निर्मिती खर्च ४०० कोटी, पहिल्या दिवशीची कमाई ५० कोटी, पण दुसऱ्या दिवशी सगळ्यावर पडलं पाणी

मुंबई : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत याचा कुली सिनेमा १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाचा एकूण

Mahavatar Narsimha Box Office Collection: 'महावतार नरसिंह' ने भारतातील दुसरा सर्वात मोठा विक्रम मोडला, लवकरच प्रथम स्थानावर येण्याची शक्यता

Mahavatar Narsimha Box Office Collection: महावतार नरसिंह बॉक्स ऑफिस कलेक्शन: 'महावतार नरसिंह' या एनिमेटेड फिल्मने भारतातील दुसरा सर्वात

तांबव्याचा विष्णूबाळा रुपेरी पडद्यावर अवतरणार

मुंबई : मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेता सयाजी शिंदे यांनी दमदार अभिनयाच्या जोरावर

सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटाचा मुंबईतला सेट तोडला, शूटिंग रद्द

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान 'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात मुख्य कलाकराच्या भूमिकेत आहे. अपूर्व लाखिया या

‘बिन लग्नाची गोष्ट’, लिव्ह-इन रिलेशनशिप संकल्पनेवर आधारित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Movie Teaser: नात्यांच्या पारंपरिक चौकटींना धक्का देणारा आणि एक नव्या विचारांची झलक देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ या आगामी

'नाफा' मराठी चित्रपट महोत्सव २०२५ अमेरिकेत दणक्यात संपन्न: मराठी चित्रपटांचा जगभर प्रसार करण्याचा संकल्प!

सॅन होजे: संपूर्ण अमेरिका आणि कॅनडामधील मराठी रसिकांच्या प्रचंड प्रतिसादात 'नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२५' कमालीचा