नवी दिल्ली: इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष सहाव्या दिवशीही सुरू आहे. दोन्ही बाजूने भीषण बॉम्ब हल्ला करण्यात आला. इस्त्रायलच्या सुरक्षा रक्षकांनी इराणच्या रिफायनरीज आणि सैन्य कमांडवर हल्ला करत ते उद्ध्वस्त केले. तर इराणने रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने दावा केला की बुधवारी इराणच्या सैन्याने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यात हायपरसोनिक Fatah-1 मिसाईलचा वापर केला.
इराणच्या मते फत्ताह मिसाईल हे हायपरसोनिक मिसाईल आहे जे मॅक ५ अथवा ध्वनीच्या गतीने पाच पटीने म्हणजेच साधारण ३८०० मील प्रति तासाच्या वेगाने हल्ला करते.
याआधी आंतरराष्ट्रीय ऑटोमिक एनर्जी एजन्सीने हा दावा केला की इराणच्या एका अणुकेंद्राला लक्ष्य बनवण्यात आले होते. राष्ट्रपती ट्रम्प यांचा दावा आहे की अमेरिकेचा इराणच्या एअरस्पेसवर संपूर्ण ताबा आहे. इराणचे म्हणणे आहे की त्यांनी तेल अवीवमध्ये एका गुप्त केंद्राला लक्ष्य बनवले आहे. तर इस्त्रायलने नागरिक आणि सैन्य ठिकाणांवर हल्ला केल्याला दुजोरा दिला आहे.