Wednesday, July 9, 2025

Israel-Iran War: खमेनेई यांच्या ठिकाणांवर इस्त्रायलचा जोरदार हल्ला, देशाला संबोधित केल्यानंतर झाला हल्ला

Israel-Iran War: खमेनेई यांच्या ठिकाणांवर इस्त्रायलचा जोरदार हल्ला, देशाला संबोधित केल्यानंतर झाला हल्ला

तेहरान: इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनेई यांनी देशाला संबोधित केले. लाईव्ह टीव्हीवर संबोधित केल्यानंतर काही मिनिटातच इस्त्रायलच्या लढाऊ विमानांनी तेहरानच्या लवीजन या भागात हल्ला केला. लवीजान हे खमेनेई यांच्या संभाव्य गुप्त ठिकाण मानले जाते. या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, खमेनेई या हल्ल्यात बळी तर नाही पडले अशी अटकळी बांधल्या जात आहेत.


इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खुलेपणे म्हटले होते की जर खमेनेई संपले तर युद्ध आणि इराणचे शासन दोन्ही संपून जातील. त्याचदरम्यान हा हल्ला करण्यात आला आहे.


याआधी इराणी मीडियाने रिपोर्ट दिला होता की खमेनेई यांना तेहरानच्या उत्तर-पूर्व भाग लवीजानच्या एका भूमिगत बंकरमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्याचमुळे की काय इस्त्रायलने तो बंकरला लक्ष्य बनवले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, या हल्ल्यानंतर अद्याप ना इस्त्रायल अथवा इराण दोन्हीकडूनही कोणत्याही प्रकारे अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र या घटनेने दोन्ही देशातील सुरू असलेला तणाव तसेच युद्धजन्य परिस्थिती अधिक गंभीर बनवली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >