Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

Health: रात्री झोपण्याआधी खाऊ नका या गोष्टी...नाहीतर येणार नाही झोप

Health: रात्री झोपण्याआधी खाऊ नका या गोष्टी...नाहीतर येणार नाही झोप

मुंबई: प्रत्येकाला वाटते की रात्रीची झोप ही शांत आणि गाढ असावी. मात्र अनेकदा आपण झोपेच्या आधी अशा गोष्टींचे सेवन करतो ज्यामुळे आपली झोप खराब होऊ शकते.

खरंतर काही गोष्टींचे सेवन केल्याने तुमची तब्येत बिघडू शकते. तसेच झोपेतही व्यत्यय येऊ शकतो.

झोपण्याआधी खूप तेलकट तसेच तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यास छातीत जळजळ होण्याची शक्यता असे. यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. झोपण्याआधी तळलेले पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो.

चॉकलेटमध्ये कॅफेनचे प्रमाण अधिक असते. अशातच याचे सेवन तुमचा मेंदू अॅक्टिव्ह करू शकतो. तसेच याचा परिणाम आपल्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.

कॉफी आणि चहामध्येही कॅफेनचे प्रमाण अधिक असते ज्याचे सेवन झोपण्याआधी करू नये. अल्कोहोलचे सेवन तुम्हाला डिहायड्रेट करू शकते. अशा स्थितीत रात्रीच्या वेळेस तुमची झोप बिघडू शकते.

Comments
Add Comment