
आगामी १५ ऑगस्टपासून देशभरात राबवणार योजना
नवी दिल्ली : केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, बुधवारी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे FASTag बद्धलची घोषणा केली. वाहनचालकांसाठी लवकरच फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू होणार आहे. या नव्या योजनेंतर्गत वाहनधारकांना ३ हजार रुपयात वर्षभर (२०० ट्रीप) टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. आगामी १५ ऑगस्ट २०२५ पासून ही योजना लागू होईल.
गडकरींनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केल्यानुसार आगामी १५ ऑगस्टपासून सुरू होणारी ही पास केवळ गैर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी उपलब्ध असेल. पास सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० फेऱ्या पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल) वैध राहील. वार्षिक पासमुळे देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरून सहज आणि किफायतशीर प्रवास करता येईल, असे गडकरींनी म्हंटले आहे.
Union Minister Nitin Gadkari says, "We are introducing a FASTag-based Annual Pass priced at Rs 3,000, effective from 15th August 2025. Valid for one year from the date of activation or up to 200 trips—whichever comes first—this pass is designed exclusively for non-commercial… pic.twitter.com/IbfCuIFRNB
— ANI (@ANI) June 18, 2025
नवीन धोरण
"नवीन धोरण ६० किलोमीटरच्या परिघात असलेल्या टोलनाक्यांसंदर्भातील जुन्या समस्यांचे निराकरण करते आणि एकाच, परवडणाऱ्या व्यवहाराद्वारे टोल भरणे सुलभ करते. टोलनाक्यांवरील वेळ कमी करणे, वाहतूक कोंडीतून सुटका करणे आणि टोल प्लाझावरील वाद कमी करणे यासह लाखो खासगी वाहन मालकांना जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देणे, हा या वार्षिक पासचा उद्देश असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. इच्छुकांना 'राजमार्ग यात्रा' या अधिकृत अॅपद्वारे हा पास अॅक्टिवेट करू शकतील. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनही पास मिळवता येईल.

तुकोबा पालखी सोहळ्याला प्रारंभ लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी आज दुपारी अडीजच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थानं ठेवतील. ...
FASTag पासची वैशिष्ट्ये काय?
- किंमत : ३ हजार रूपये
- वैधता : सक्रियतेच्या तारखेपासून एक वर्ष किंवा २०० ट्रिप्स (जे आधी संपेल)
- सुरुवात तारीख : १५ ऑगस्ट २०२५
पात्र?
- ही योजना फक्त खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी उपलब्ध असणार.
- पास एकदा सक्रिय केल्यावर तो एक वर्ष किंवा २०० प्रवासांपर्यंत, यापैकी जे आधी संपेल, तेवढ्यासाठीच वैध असेल.
पास कसा काढायचा ?
- वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी एक स्वतंत्र लिंक लवकरच हायवे ट्रॅव्हल ॲप आणि NHAI/MoRTH वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.
- नागरिक ही लिंक सुरू झाल्यानंतर या अधिकृत ॲपद्वारे हा पास अॅक्टिवेट करू शकतील.
- तसेच NHAI (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनही पास मिळवता येईल.