Sunday, August 24, 2025

पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...

पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावासाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. जूनच्या सुरवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने काही भागात पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे शनिवारी काही भागात पावसाचा जोर वाढला. मुंबईतही रविवारी आणि सोमवारी पावसाने झोडपून काढले. सध्या हवामानात बदल झाल्याने काही ठिकाणी जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील कोकणातील काही भागात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यासहीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर पुणे, सातारा, कोल्हापूर, या भागातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर या भागतही हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसाचा काही भागात अंदाज व्यक्त केल्याने काही धरणात क्यूसेक 2500 पाण्याचा साठा आहे. त्यामुळे जोरदार पावसाच्या आगमनामुळे धरणाचा क्यूसेक वाढू शकतो.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा