इराणच्या सरकारी वृत्त प्रसारण केंद्रावर इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला

तेहरान : इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढतच चालला असून, दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. या वाढत्या संघर्षामुळे दोन्ही राष्ट्रांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. अशातच पुन्हा एकदा इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात इस्रायलने सरकारी वृत्त प्रसारण केंद्राला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यानंतर सरकारी दूरदर्शनचे थेट प्रक्षेपण अचानक थांबवण्यात आले. इतकंच काय तर अँकरलाही स्टुडिओ सोडून पळ काढावा लागला.

मीडिया रिपोर्टनुसार, इराणच्या अनेक भागांवर इस्रायली क्षेपणास्त्रांचा वर्षाव होत आहे. दोन्ही देश सातत्याने एकमेकांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करत असल्याने तणाव शिगेला पोहोचला आहे.या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये एक अँकर लाईव्ह बुलेटिन दरम्यान बातम्या वाचत असताना दिसत आहे. याचवेळी स्टुडिओच्या परिसरात एक क्षेपणास्त्र येऊन आदळते. या घटनेमुळे अँकर बुलेटिनच्या मध्यातच घाबरते आणि तिला जागेवरून उठून पळून जावे लागते. सुदैवाने, या घटनेत अँकर सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी होते.



इस्रायलने यापूर्वीच सांगितले होते की, ते आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य मार्गावर आहेत. महत्त्वाचे म्हणजे, इस्रायलने आधीच तेहरानमधील लोकांना त्यांची घरे रिकामी करण्यास सांगितले होते. दोन्ही देशांमधील संघर्ष वाढत असल्यामुळे दोन्ही देशांचे नागरिक सुरक्षित निवाऱ्यासाठी पळ काढत आहेत, ज्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता

काँगोमध्ये बोट उलटल्या, १९३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी

काँगो: आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी येत आहे. येथील वायव्य इक्वेटूर प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट