
मीडिया रिपोर्टनुसार, इराणच्या अनेक भागांवर इस्रायली क्षेपणास्त्रांचा वर्षाव होत आहे. दोन्ही देश सातत्याने एकमेकांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करत असल्याने तणाव शिगेला पोहोचला आहे.या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये एक अँकर लाईव्ह बुलेटिन दरम्यान बातम्या वाचत असताना दिसत आहे. याचवेळी स्टुडिओच्या परिसरात एक क्षेपणास्त्र येऊन आदळते. या घटनेमुळे अँकर बुलेटिनच्या मध्यातच घाबरते आणि तिला जागेवरून उठून पळून जावे लागते. सुदैवाने, या घटनेत अँकर सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी होते.

इस्त्रायल-इराण यांच्यातील युद्धात ट्रम्प यांचा इशारा, तेहरान खाली करा...
नवी दिल्ली: इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध अद्याप थांबलेले नाही. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत सोशल ...
इस्रायलने यापूर्वीच सांगितले होते की, ते आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य मार्गावर आहेत. महत्त्वाचे म्हणजे, इस्रायलने आधीच तेहरानमधील लोकांना त्यांची घरे रिकामी करण्यास सांगितले होते. दोन्ही देशांमधील संघर्ष वाढत असल्यामुळे दोन्ही देशांचे नागरिक सुरक्षित निवाऱ्यासाठी पळ काढत आहेत, ज्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
🚨 This is the moment the Islamic Republic of Iran’s State TV was hit live on air.
A key symbol of regime propaganda.
Wow, What can I say…
They used that same TV to bring my own family on air to disown me, publicly.
They broadcast lies that I was raped by three men after I… pic.twitter.com/QoZTWHhlo8
— Masih Alinejad 🏳️ (@AlinejadMasih) June 16, 2025